Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, २० डिसेंबरला कळणार जनतेचा कौल कुणाला!

सकाळ पासून ते दुपारी 3:30 पर्यत राज्यातील विविध जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं याविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Election | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

या आठवड्याचा विकेंड ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी सर्वाधिक हॅपनिंग ठरला. कारण  आज राज्यातील एकूण  7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा पार पडल्या आहेत. तर २० डिसेंबर म्हणजेचं मंगळवारी या निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election 2022) झालेल्या या मतदानात जनतेने नेमका कुणाला कौल दिला हे अवघ्या दोन दिवसांत कळणार आहे. तरी ग्रामिण भागात होणारी ही ग्रामपंचायत निवडणुक लोकसभा (Loksabha Election) किंवा विधानसभा निवडणुकीपेक्षाही (Vidhan Sabha Election) अधिक रोमांचक झाली. कारण यांत कुठला राजकीय पक्ष नाही तर प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली असते. स्वतच्या गावात आपल्याला किती मान, कोण वरचठं हा बाबत ही निवडणुक असल्याने गावखेड्यात या निवडणुकीचा मोठा उत्साह बघायला मिळला. तरी आता शहरी भागा प्रमाणेचं ग्रामिण भागातील नागरिक देखील मतदानाच्या बाबतीत जागृत झाल्याचं बघायला मिळालं.

 

सकाळ पासून ते दुपारी 3:30 पर्यत राज्यातील विविध जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं याविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत:-

धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 टक्के मतदान झाले आहे. तर कोकणातील महत्वपूर्ण जिल्हा रायगड येथे ७०.८२ टक्के मतदान झालं आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात १९० ग्रामपंचायतीत एकूण ६९.४२ टक्के मतदान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४५ टक्के मतदान पार पडलं असुन एकुण ९३ ग्रामपंचायतीसाठी हे मतदान झाल्याची आकडेवारी आहे. खानदेशातील महत्वाचा जिल्हा जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत ६८.५८ टक्के मतदान पार पडलं. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात 113 ग्रामपंचायतीत निवडणूका पार पडल्या असुन मतदान मात्र 66.17 टक्के मतदान झालं. तर अकोला जिल्ह्यात ६०.६० टक्के मतदान झालं असुन तब्बल २६६ ग्रामपंचायतीच्या सरपंचासाठी मतदान झालं. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान झालं आहे. (हे ही वाचा:- Gram Panchayat Election 2022: गेल्या २० वर्षांपासून 'या' गावाला सरपंचचं नाही, प्रशासक राज्य असणार महाराष्ट्रातील अनोख गाव)

 

राज्यात अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील एकूण ७७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडल्या आहेत.