GPS Toll Collection Date: मार्च 2024 पर्यंत भारतात GPS-आधारित टोल संकलन; प्रणाली घ्या जाणून
सरकार GPS-आधारित टोल संकलन (GPS- Based Toll Collection In India) प्रणालीसह अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करून महामार्गावरील टोल वसुलीत क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे, अशा आशयाचे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले.
सरकार GPS-आधारित टोल संकलन (GPS- Based Toll Collection In India) प्रणालीसह अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करून महामार्गावरील टोल वसुलीत क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे, अशा आशयाचे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले. ते एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले, पुढील वर्षी मार्चपर्यंत (GPS Toll Collection Date) उपक्रम सुरू करण्याच्या योजनांसह, विद्यमान टोल प्लाझासाठी देशव्यापी बदली म्हणून GPS-आधारित टोल प्रणालीचा शोध घेण्याच्या सरकारच्या धोरणात्मक दृष्टीकोनाची रूपरेषा सांगितली.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केला की, त्यांच्या मंत्रालयाने स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (ANPR कॅमेरा) चा समावेश असलेले दोन पथदर्शी प्रकल्प हाती घेतले आहेत. टोल बूथवर वाहने थांबवण्याची गरज दूर करून स्वयंचलित टोल संकलन सुलभ करणे, हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. वाहतुकीची कोंडी कमी करणे आणि महामार्गावरील अचूक अंतराच्या आधारे वाहनचालकांकडून शुल्क आकारले जाणारी प्रणाली सुरू करणे हे या उपक्रमाचे प्रमुख मुख्य उद्दिष्ट आहे. (हेही वाचा, Driverless Cars In India Update: 'जोपर्यंत मी परिवहन मंत्री आहे, तोपर्यंत भारतात चालकविरहित गाड्यांना परवानगी दिली जाणार नाही'; नितीन गडकरी यांचे आश्वासन)
सध्याच्या टोल व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेवर प्रकाश टाकत गडकरी यांनी म्हटले की, सन 2018 ते 2019 या आर्थिक वर्षात टोलनाक्यांवर वाहनांना सरासरी 8 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. तथापि, त्यानंतरच्या वर्षांमध्ये (2020-21 आणि 2021-22) FASTags लागू केल्यामुळे, सरासरी प्रतीक्षा कालावधी मोठ्या प्रमाणावर घटला आणि तो केवळ 47 सेकंदांपर्यंत आला. (हेही वाचा - Nitin Gadkari On Diesel Vehicles GST: डिझेल वाहन विक्रीवर 10% GST? नितीन गडकरी यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरण)
प्रस्तावित GPS-आधारित टोल संकलन प्रणाली अंतर्गत, वाहनांना GPS उपकरणे बसवली जातील जी रस्त्यावर त्यांची स्थिती अचूकपणे निर्धारित करतात. आधुनिक वाहने आधीच या तंत्रज्ञानाने सुसज्ज असताना, सध्याच्या वाहनांना (ज्यांना जीपीएस प्रणाली जोडली नाही) अशा उपकरणांची स्थापना करणे आवश्यक आहे. गडकरींनी एएनपीआर कॅमेऱ्यांच्या संभाव्य वापराचाही उल्लेख केला, ज्यामुळे वाहनांमध्ये जीपीएस उपकरणांची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.
जीपीएस वापरून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून टोलच्या रस्त्यावर वाहनाने प्रवास केलेल्या अंतराची गणना ही प्रणाली करेल. पार केलेल्या अंतराच्या आधारे टोल शुल्क स्वयंचलितपणे मोजले जाईल आणि संबंधित रक्कम चालकाच्या खात्यातून अखंडपणे वजा जाईल. या नाविन्यपूर्ण पध्दतीमुळे टोल बूथवर वाहने थांबवण्याची किंवा त्यांचा वेग कमी करण्याची गरज भासत नाही. टोल वसुली प्रक्रिया सुलभ होते आणि वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होते, असे गडकरी म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)