Bhagat Singh Koshyari: शिंदे गटाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा जाता जाता हळूच धक्का; काय घडलं नेमकं?

कोश्यारी यांना काल राजभवनातून निरोप देण्यात आला. भगत सिंह कोश्यारी यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली. संवैधानिक पदावर असतानाही त्यांची राजकीय अभिलाशा लपून राहिली नाही.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credit Facebook)

महाराष्ट्राचे राज्यापाल म्हणून कार्यभार पाहिलेले भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आता पायउतार होत आहेत. कोश्यारी यांना काल राजभवनातून निरोप देण्यात आला. भगत सिंह कोश्यारी यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली. संवैधानिक पदावर असतानाही त्यांची राजकीय अभिलाशा लपून राहिली नाही. दरम्यान, कोश्यारी यांनी जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही (Eknath Shinde Group) हळूच धक्का दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातही कोश्यारी यांच्याबद्दल काहीशी अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाला धक्का देताना त्यांनी भाजपला मात्र बक्षीस दिल्याचे पाहायला मिळते.

त्याचे झाले असे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची एक जागा रिक्त होती. जी दहाव्या क्रमांकाची होती. आगोदरच्या नऊ जागांवर भाजप समर्थक मंडळींची नियुक्ती करण्यात आली आहे. आता राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. त्यामुळे या एका रिक्त जागेवर एकनाथ शिंदे गटातील एखाद्या समर्थकांची वर्णी लागेल असे बोलले जात होते. शिंदे गटातूनही तशीच आपेक्षा होती. मात्र, कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन शिंदे गटाला हळूच धक्का दिला. शिंदे गटाला ठेंगा दाखवत सीनेटची त्या एकमेव रिक्त जागेवरही भाजप समर्थकाचीच वर्णी लावली. (हेही वाचा, Governor Bhagat Singh Koshyari & 5 Controversies: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि त्यांच्या वक्तव्याने निर्माण झालेले 5 वाद)

प्राप्त माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या रिक्त जागेवर प्रभादेवी येथीली धनेश सावंत यांची वर्णी लागली आहे. धनेश सावंत हे अड आषिश शेलार यांचे निकटवर्तीयय मानले जातात. राज्यपालांनी नियुक्ती केल्याचे पत्र हे 3 फेब्रुवारी रोजी निघाले आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सर्वच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. ज्यावर भाजपचीच मंडळी पाहायला मिळते.

दरम्यान, रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यपाल कोश्यारी यांचा राजकीय कार्यक्रम अथवा दिशा तर अद्याप स्पष्ट झाली नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात नेमके आहे तरी काय याबाबत उद्याप पत्ते ऊघड झाले नाहीत. करण, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अद्याप तरी कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाही.