Gopinath Munde Death Anniversary: गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन; पंकजा मुंडे गोपीनाथगडावरुन काय बोलणार? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन (Gopinath Munde Death Anniversary) दरवर्षी 3 जून रोजी गोपीनाथगड (Gopinath Gad) येथे साजरा होतो. आजच्या दिवशी त्यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेक नेते, चाहते गोपीनाथगडावर जमतात.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन (Gopinath Munde Death Anniversary) दरवर्षी 3 जून रोजी गोपीनाथगड (Gopinath Gad) येथे साजरा होतो. आजच्या दिवशी त्यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेक नेते, चाहते गोपीनाथगडावर जमतात. आजच्या दिवशी पंकजा मुंडे गोपीनाथगडावरुन काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. पाठिमागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने गोपीनाथगडावर जाता आले नव्हते. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर आज पुन्हा एकदा गोपीनाथगडावर गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजच्या कार्यक्रमसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील उपस्थित राहणार आहेत.
पंकजा मुंडे यांनी आजच्या कार्यक्रमाची कालच पाहणी केली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भविष्यातील आपल्या राजकारणाची दिशा कशी असेल त्याबाबत आपण संकल्प करणार आहोत. दोन वर्षे गोपीनाथगडावर यायला जमले नव्हते. कोरोनाचे सावट होते. मात्र, यंदाच्या वर्षी यायला मिळत आहे. त्यामुळे माझी भविष्यातील भूमिका काय आणि कशी असेल याबाबत कार्यकर्त्यांसमोर बोलेन, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मला न बोलताही कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळते. त्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते यांचा भविष्यातील प्रवास कसा असेल याबाबत संकल्प करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (हेही वाचा, Pankaja and Pritam Munde Share Stage With Sharad Pawar: पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी शरद पवारांसोबत शेअर केले स्टेज)
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने त्यांचे पुनर्वसन करावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधानपरिषद भेटली नाही. आता राज्यसभा आणि विधानपरिष अशा दोन्ही निवडणुका एकापाठोपाठ पार पडत आहे. या वेळी तर पंकजा यांना दोन्हीपैकी एक पक्ष काहीतरी देतो का? याबाबत उत्सुकता आहे.