Gondia Shocker: गोंदिया मध्ये फूटबॉल खेळताना हृद्यविकाराच्या झटक्याने 11 वर्षीय मुलाचं निधन
मात्र, उपचारादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली
गोंदिया (Gondia) मधील अर्जुनी-मोरगाव (Arjuni Morgaon) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 11 वर्षीय संगम बोपचे (Sangam Bopche) या विद्यार्थ्यांचा फुटबॉल (Football) खेळताना मृत्यू झाला आहे. नवोदय विद्यालयामधील सहावीच्या विद्यार्थ्याचा खेळताना जीव गेला आहे. त्याला भोवळ आली आणि तो खाली कोसळला.
संगम हा गोंदिया मधील सोनी मधील रहिवासी आहे. नवेगावबंध मधील नवोदय विद्यालयात खेळण्यासाठी तो मैदानात आला. खेळता खेळता भोवळ येऊन पडलेल्या संगमला तातडीने शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये नेले. हे देखिल नक्की वाचा: Cardiac Arrest Cases in Mumbai: मुंबईतील 18-40 वयोगटातील तरुणांमध्ये वाढतोय कार्डियक अरेस्टचा धोका; गेल्या सहा महिन्यात 17 हजार 880 जणांचा मृत्यू .
नवेगावबंध मधील आरोग्य केंद्रामध्ये त्याची तपासणी करून त्याला साकोली येथील हृदयरोग तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. ही घटना मंगळवार (8 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने सार्यांवर शोककळा पसरली आहे.