Gondia Rape and Murder Case: गोंदिया मध्ये 12 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या; घटनास्थळी आढळला रक्ताने माखलेला दगड
Rape And Murder (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गोंदिया (Gondia) मध्ये 12 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार 21 एप्रिल ची आहे. गोंदिया च्या देवरी (Deori) भागातील ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावकर्‍यांनी निदर्शनं करत आपला राग व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपी बलात्कार आणी खूनानंतर पसार झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट नुसार, सहावी मध्ये शिकत असलेल्या या पीडीत मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये आणि कुजलेल्या स्थितीत आढळल्यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला आहे. मुलीचा मृतदेह Ganutola armed outpost भागात आढळला आहे. या भागात गोरिला अर्थात वानरांचा मोठा वावर असतो. नक्की वाचा: Mira Road Rape case: 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल; संतप्त जमावाने फोडला चिकन शॉप .

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनास्थळी रक्ताने माखलेला दगडही सापडला आहे. गोठणपार हा भाग पीडितेच्या गावापासून 3 किमी अंतरावर आहे. गोंदियातील आदिवासींची अल्पवयीन मुलगी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. सुमारे 11 तासांनंतर, तिचा कुजलेला मृतदेह धवलखेडी जंगलात आढळून आला आणि सारा प्रकार समोर आला. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, मुलीच्या डोक्यावर आणि कुजलेल्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत. चेहरा आणि मानेवर ओरखडे आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला दगड हलविला गेला नाही, ज्यामुळे अल्पवयीन मुलीला तिचे डोके व चेहरा उचलून वारंवार चिरडण्यात आल्याचा अंदाज आहे. शेजारच्या एका लग्नाला गेल्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिची शोधशोध सुरू झाल्यानंतर तिचा मृतदेह आढळला आहे.

दरम्यान गावकर्‍यांच्या माहितीनुसार पीडीत अल्पवयीन मुलगी गायब झालेल्या दिवशी रात्री 8 वाजता बाईक वरून फिरताना दिसली होती. मात्र ती कोणासोबत बाईक वर बसली होती याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाच्या तपास अधिकार्‍याच्या माहितीनुसार, पीडीतेने बलात्काराचा प्रतिकार केला असावा. परिणामी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. मुलीने घटनेची वाच्यता करू नये. त्याची धमकी देऊ शकते किंवा मदतीसाठी हाक मागू शकते म्हणून तिला रोखण्यासाठी हा खून झाला असू शकतो.