Gang-Rape And Murder Of Minor Girl: सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक

मृत मुलगी लग्न समारंभासाठी आली होती त्यावेळीस ही घटना घडली. मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

Gondia Crime: गोंदिया जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी लग्न समारंभासाठी आली होती त्यावेळीस ही घटना घडली. मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मुले हे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.  (हेही वाचा- इमारतीच्या टेरेसवर 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 4 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोटाणपार गावात लग्न समारंभासाठी मृत मुलगी सह कुटुंब आली होती. १९ एप्रिल रोजी लग्नाच्या कार्यक्रमातून एकाने मित्राने तीला बाईकवर बसवून वडेकसा जंगल येथे नेलं. तेथे उपस्थित तीन जणांनी मिळून तरुणीसोबत सामुहिक बलात्कार केला. एवढं नव्हे तर दगडाने ठेचून ठेचून मुलीची हत्या केली. या ठिकाणाहून काही अंतरावर चिचगड पोलिस स्टेशन आहे.

लग्न समारंभातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांना सुरुवातीला अपहरण झाल्याचा संशय होता. दरम्यान २० एप्रिलला जंगलात गावकऱ्यांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी चौकशी आणि तपासणी सुरु केली. मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे दिसून आले.

सुरुवातीला पोलिसांनी चक्र फिरवली. पोलिसांनी मुलीचा मोबाईल ताब्यात घेतला त्यावेळीस आरोपींशी तीने चॅंटीग केल्याचे समोर आले. पोलिसांनी चारही मुलांना ताब्यात घेतले. सुरुवातीला कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आणि चौघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

चौघे चिल्हाटी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना नागपूर येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. कुटुंबियांना या घटनेनंतर मोठा धक्काच बसला आहे. पोलिसांकडे कोणताही पुरवा नसातानाही काही दिवसांत आरोपींना ताब्यात घेतले.



संबंधित बातम्या