नोकरी, धंदा करण्याची गरज नाही, बेरोजगार आणि गरजूंना पैसे कमावण्याची सुवर्णसंधी; मुंबई महापालिकेची हटके योजना
या योजनेत सहभाही होत अर्थप्राप्ती करण्याची बेरोजगार तरुण आणि गरजू नागरिकांना संधी आहे.
महाराष्ट्र आणि खास करुन मुंबई (Mumbai ) शहरातील बेरोजगार तरुण आणि गरजूंसाठी खुशखबर आहे. तुम्ही जर बेरोजगार असाल, नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल तर फार कष्ठ न घेता तुम्हाला बक्कळ पैसे कमावण्याची संधी आहे. होय, अट फक्त इतकीच की तुमची दृष्टी साफ असायला हवी आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरुन फिरण्याची तुमची तयारी असायला हवी. तसेच, तुम्ही मुंबई शहराबाहेर असाल तर तुमची मंबई शहरात येण्याची तयारी असायला हवी. तुम्ही जर ही पात्रता पूर्ण केलीत तर तुम्ही पैसै कमावण्यास पात्र आहात. महत्त्वाचे म्हणजे ही काही लॉटरी किंवा चमत्कार नाही. हा आपल्या मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) प्रशासनाचा उपक्रम आहे. वाटलं ना आश्चर्य? तर मग घ्या जाणून..
काय आहे योजना?
मुंबई शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे (Pothole) हा नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला नेहमी लक्ष्य केले जाते. पण, असे असले तरी रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचे मुंबई महापालिका मान्य करत नाही. आता तर मुंबई महापालिका एक नवीच योजना घेऊन आली आहे. या योजनेद्वारे मुंबईकरांना आपले भरपूर पैसे कमावण्याचा आणि आपले रस्तेही खड्डेमुक्त करण्याची सूवर्णसंधी प्राप्त झाली आहे. मुंबई महापालिकेने आजपासून म्हणजेच शुक्रवार, १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ अशी नामी योजना मुंबईकरांसाठी आणली आहे. या योजनेत सहभाही होत अर्थप्राप्ती करण्याची बेरोजगार तरुण आणि गरजू नागरिकांना संधी आहे. (हेही वाचा, Central Bank Of India Recruitment 2019: माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारीसह या 76 जागांसाठी भरती, 'ही' आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख)
मुंबई महापालिका ट्विट
‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ योजनेतील नियम व अटी |
|
मुंबई महापालिका ट्विट
मुंबई शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे यांवरुन मुंबई महापालिकेकडे अनेक तक्रारी येत असतात. तक्रारी आल्या की, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये तात्पूरती खडी, रेती अथवा पेव्हरब्लॉक टाकून टाकले जातात. काही दिवसांनंतर पुन्हा रस्त्यांवरचे खड्डे तसेच दिसतात. त्यामुळे महापालिका टीकेचा विषय ठरते. यावर महापालिकेने नामी शक्कल लढवत ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ अशी योजनाच जाहीर केली आहे. मुंबईकरांना रस्ते चांगले मिळावे यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. परंतू मुंबईतील पाऊस पडल्याने रस्त्यांवरील खड्डे वाढतात असे पालिका सांगते. यावर खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने विदेशात वापरले जाणार महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान आणले. परंतू तरीही रस्त्यावरचे खड्डे काही कमी झाले नाहीत. तर, मंडळी तुम्हीही पैसा कमवू इच्छित असाल तर, मुंबई महापालिकेच्या ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’या योजनेत सहभाही व्हा.