Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, सोने चांदी दर भडकले

रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) परिणाम या सोने-चांदी (Gold-Silver Rate Today) दरांवर झाला नसता तरच नवल. आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान धातू आणि रुपया यांच्यातील दरांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, सोने चांदी दर भडकले
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने (Gold) हा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मौल्यवाण समजला जाणारा धातू. त्यामुळे या धातूला नेहमीच चढा भाव पाहायला मिळतो. त्यातच जगभरात घडणाऱ्या अनेक घटना घडोमोडी या धातूच्या दरवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात. त्यामुळे सहाजिकच रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) परिणाम या सोने-चांदी (Gold-Silver Rate Today) दरांवर झाला नसता तरच नवल. आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान धातू आणि रुपया यांच्यातील दरांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 48,400 रुपये इतकी पाहायला मिळत आहे. याच धातूची 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमची पाठिमागील ड्रेडमधील किंमत 48,400 रुपये इतकी पाहायला मिळत होती. गुड रिडर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार चांदी प्रती किलो 70,000 रुपये दराने विकली जात आहे. दरम्यान, देशभरातील विविध ठिकाणी लागणाऱ्या करांमुळे सोने चांदी दरांच्या किमती वेगवेगळ्या पाहायला मिळू शकतात.

महाराष्ट्रातील विविध शहरातील सोने दर

मुंबई

22 कॅरेट- 48,400 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट- 48,450 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,850 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट- 48,500 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,900 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

(* वरील सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार)

वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2022 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).