Gold Rate On Dhanteras: धनतेरसच्या मुहूर्तावर आज सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोनं, चांदीचा दर काय?

आज धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पहा आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये पहा काय आहेत सोनं आणि चांदीचा दर!

Gold Rate | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Gold & Silver Rate in Maharashtra: हिंदू धर्मियांसाठी मोठा उत्साहाचा, आनंदाचा, जल्लोषाचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali). आज दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजेच वसूबारस आणि धनतेरस हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत. धनाची देवता कुबेर याची पूजा करून आजच्या दिवशी घरात सुख, समृद्धी सोबत आर्थिक संकट दूर रहावे यासाठी प्रार्थना केली जाते. यासोबतच धनतेरसच्या (Dhanteras) दिवशी सोनं खरेदी करणं लाभदायक समजलं जातं. त्यामुळे आजच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पहा आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये पहा काय आहेत सोनं आणि चांदीचा दर! Dhanteras 2019 Shubh Muhurt: धनतेरसच्या दिवशी पुजा आणि सोनं खरेदीचा ‘हा’ आहे शुभ मुहूर्त.

दिवाळी पाठोपाठ लग्नसराई देखील सुरू होत असल्याने अनेक घरामध्ये सोनं खरेदीला सुरूवात केली जाते. त्यामुळे आज धनतेरसचा शुभ मुहूर्त साधत सोनं खरेदीसाठी नक्की बाहेर पडा.हेही वाचा - Diwali 2018 : धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये सोन्याचा दर काय?

मुंबई - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

पुणे - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

नाशिक - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

नागपूर - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

चांदीचा दर मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरामध्ये किती?

सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वाढले असून मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरासह अन्य ठिकाणी दर48,770 प्रति किलो राहिले आहेत.

सोनं खरेदी धनत्रयोदशी दिवशी करणार असाल तर त्या निमित्त खास ऑफर असतात. त्याचा फायदा घेऊनही तुम्ही जवळच्या सराफा दुकानामध्ये सोनं खरेदी करू शकता. तसेच प्रत्येक सराफानुसार घडणावळ, सोन्याचा दर आणि त्यासाठीच्या ऑफर वेगवेगळ्या असतात.

टीप: हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.