IPL Auction 2025 Live

Ganeshotsav 2022: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी भाजपकडून भेट, 300 बसमध्ये मोफत प्रवासाची दिली मुभा

गणेशोत्सवासाठी लोकांना आरामदायी प्रवास हवा होता. त्यामुळे भाजपने कोकण विभागासाठी 300 मोफत बससेवेची व्यवस्था केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील लोकप्रिय गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्सवापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी भाजपने (BJP) दिलेल्या 300 एसटी बसेसना (ST Bus) हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढाही (Mangal Prabhat Lodha) होते. प्रचंड दिरंगाई झालेल्या मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हा रस्ता कोकणातून जातो आणि गेल्या 13 वर्षांपासून त्याचे बांधकाम अपूर्ण आहे.

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपने मुंबई ते कोकणात 300 मोफत बसेसची व्यवस्था केली होती. गणेशोत्सवासाठी लोकांना आरामदायी प्रवास हवा होता. त्यामुळे भाजपने कोकण विभागासाठी 300 मोफत बससेवेची व्यवस्था केली आहे. नुकतीच मोदी एक्स्प्रेसही प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांना नेहमीच मागणी असते. कोकणात गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकारनेही कोकणात जादा बस आणि गाड्या दिल्या आहेत.  राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या प्रवासी वाहनांनाही टोलमाफी जाहीर केली आहे.  भाजपने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, याचा मला आनंद आहे. अन्यथा, लोक त्यांच्या मूळ ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणत्याही उपलब्ध वाहनाचा वापर करतात. हेही वाचा  Gautam Adani: गौतम अदानी जागातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांना टाकले मागे; ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स अहवाल प्रसिद्ध

मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गाच्या अपूर्ण कामांवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपले सरकार पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले की, आमचे मंत्री रवींद्र चव्हाण स्वत: या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत.  कोकणात सुरळीत प्रवास करण्यासाठी आमचे सरकार पुढील वर्षभरात रस्त्याचे बांधकाम पूर्ण करेल, याची खात्री मी देतो. खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांपेक्षा जास्त भाडे आकारल्यास चौकशी केली जाईल.

मुंबईत राहणार्‍या लाखो लोकांना दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील त्यांच्या गावी जायचे आहे, परंतु गर्दीमुळे बस किंवा ट्रेनचे आरक्षण कसे करावे हे त्यांना माहिती नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भाजपने हे पाऊल उचलले आहे. याची दुसरी बाजू म्हणजे भाजपला या मतदारांना बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकर्षित करायचे आहे, जे नेहमी उद्धव यांच्या शिवसेनेला मतदान करतात. आता त्यांची ही रणनीती यशस्वी होते की नाही, हे पाहावे लागेल.