Ghatkopar Railway Station Accident: घाटकोपर रेल्वे स्थानकावर भीषण अपघात, 50 वर्षांच्या प्रवाशाचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपर स्थानकावर 50 वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू. कल्याणहून CST कडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना प्लॅटफॉर्म व गाडीतल्या फटीत पडून मृत्यू. रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू.

Ghatkopar Railway Station | (Photo credit: archived, edited, representative image)

CSMT Local News: मुंबई येथील घाटकोपर रेल्वे स्थानकावर (Ghatkopar Railway Station Accident) शुक्रवारी (13 जून) संध्याकाळी एका 50 वर्षीय व्यक्तीचा अतिशय धक्कादायक अपघात Mumbai Local Train Death) झाला. ही घटना संध्याकाळी 7 वाजता घडली. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनज (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) म्हणजेच सीएसएमटी (CSMT) च्या दिशेने निघालेल्या चालत्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये हा व्यक्ती चढण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी सुरु असताना प्रवाशाने चढण्याचा प्रयत्न केला आणि तो प्लॅटफॉर्म व गाडीमधील फटीत (Railway Platform Gap Accident) पडला. या दरम्यान, तो गाडी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रवाशांचा मदतीचा प्रयत्न, पण अपघात घडलाच

घाटकोपर रेल्वे स्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी मदतीचा तत्काळ प्रयत्न केला, मात्र अपघात इतका झपाट्याने घडला की कोणीच काही करू शकले नाही. स्थानकातून सुटलेली गाडी पुढे निघून गेली, आणि या दुर्घटनेची माहिती तत्काळ मिळाली नाही. परिणामी संपूर्ण गाडी या प्रवाशाच्या अंगावरुन गेली. प्रचंड रस्तस्त्राव झाल्याने रुळांवर रक्तपात दिसत होता. तसेच, प्रवाशाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. (हेही वाचा, AC Locals With Auto Doors For Mumbai: भाडेवाड न करता मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू

  • रेल्वे प्रशासनाने या अपघाताबाबत तपास सुरू केला आहे. तपासाद्वारे हे पाहण्यात येईल की सुरक्षेचे नियम त्या वेळी लागू होते का, आणि कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष या अपघाताला कारणीभूत ठरले का.  (हेही वाचा, Pune Railway Division: मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे विभागाचा धक्कादायक अहवाल; 18 महिन्यांत 158 प्रवासी गाडीतून पडले, 49 जणांचा मृत्यू)

  • प्रशासनाने सांगितले की, ही घटना सखोलपणे तपासण्यात येईल, आणि अशा अपघातांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर प्लॅटफॉर्म व गाडीमधील फटीत पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने, ही बाब तपासाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.
  • मुंबईतील लाखो नागरिक रोज लोकल प्रवास करत असताना, ही घटना चालत्या गाडीत चढण्याचे धोके अधोरेखित करते आणि प्रवासी सुरक्षेबाबत उपाययोजनांची तातडीने गरज दर्शवते.

मुंबई मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा रेल्वेस्टेशवर नुकताच एक अपघात झाला. या अपघातात काही प्रवाशांनी आपले प्राण गमावले. या अपघाताच्या कारणांचा शोध अद्यापही घेतला जातो आहे. अजूनही चौकशी सुरुच आहे. या प्रकरणाची चर्चा, भीती आणि जनमानसातील संताप कायम असतानाच घाटकोपर येथे पुन्हा एकदा अपघात घडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement