Thane: सोसायटीच्या गच्चीवर, कॉमन एरियामध्ये एकत्र येण्यास बंदी; TMC ने जारी केले पत्रक
23 मार्चपासून संपूर्ण देश घरातच बंद आहे. याकाळात घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव वाढू नये, तो रोखला जावा म्हणून देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आले आले. 23 मार्चपासून संपूर्ण देश घरातच बंद आहे. याकाळात घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. अशात नागरिकांनी एकमेकांना भेटण्यासाठी टेरेस (Terrace) अथवा गच्ची ही जागा निवडली. गेले अनेक दिवस इमारतींच्या गच्चीवर गप्पांचा फड रंगताना दिसत आहे. अशात ठाणे महानगर पालिकेने (TMC) सोसायटीच्या गच्चीत फिरण्यावर तसेच एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. याबाबत महापालिकेने एक पत्रक जारी केले आहे.
राज्यात संचारबंदी म्हणजेच कलम 144 लागू आहे, याकाळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे. तसेच सोसायटीचे नियम मोडल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. या पत्रकात्त नमूद केले आहे, ‘मा, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील दि. 17 एप्रिल, 2020 च्या आदेशान्वये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या दरम्यान नागरिकांना अत्यावश्यूक, अत्यंत निकडीचे कारण वरगळता अन्य कारणासाठी घरावाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम 144 अन्वये, मा. पोलोस आयुक्त यांचे आदेश जा.क्र. वि.शा/कोरोना/मनाई आदेश/1703/2020 दि. 14/04/2020 अन्वये विविध कारणासाठी पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी एकत्र येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.’
पुढे म्हटले आहे, ‘ज्याअर्थी, काही गृहनिर्माण सोसायटयांमध्ये नागरिक आपल्या सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, कॉमन एरियामध्ये, पार्कीग एरियामध्ये तसेच सोसायटीच्या गच्चीवर खेळाचे आयोजन, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन किंवा अन्य विविध कारणास्तव एकत्रित येत आहेत. नागरिकांची ही कृती कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच पाझिटीव्ह रुग्णांच्या Contact Tracing साठीही अडचण निर्माण झाल्यास, सदर बाव सध्दा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे अशा गोष्टींवर निर्बंध घालण्यात येत आहेत.’ (हेही वाचा: Coronavirus: मुंबईतील Containment Zones च्या यादीतून 231 झोन्स झाले मुक्त- किशोरी पेडणेकर)
ठाण्यातील सर्व गृहनिर्ममाण सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिवांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फक्त अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे असेही या पत्रकात सांगितले आहे.