Gas Leak in Mumbai? मुंबईतील कांजुरमार्ग, घाटकोपर, चेंबूरसह 'या' भागात वायूगळती झाल्याच्या Twitter वर युजर्सकडून तक्रारी
मुंबईतील कांजुरमार्ग, घाटकोपर, चेंबूरसह अन्य काही ठिकाणी वायूगळती झाल्याच्या तक्रारी ट्विटरवरुन समोर येत आहेत. युजर्स ट्विटरवर ट्विट करत याबद्दल अधिक विचारणा करत आहेत. मात्र वायुगळती झाली आहे का याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र युजर्सकडून या वायुगळती संदर्भात विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.(Vizag Gas Leakage: गॅस गळतीमुळे 11 ठार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदतीची केली घोषणा)
मुंबई अग्निशमन दलाकडून या तक्रारींबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र काही युजर्सकडून गॅस लिकसारखा विचित्र वास येत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. आणखी एका युजर्सने म्हटले की घाटकोपर येथे सुद्धा अशाच पद्धतीने वास जाणवत आहे. ऐवढेच नाही तर युजर्संनी ट्विटरवर महापालिकेला सुद्धा टॅग केले आहे.
Tweet:
ट्विटरवर युजर्सकडून वायूगळतीच्या तक्रारी केल्या जात असून एका युजर्सच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी आम्ही मुख्य कंट्रोल रुमला याबद्दल कळवतो असे स्पष्ट केले आहे.
Tweet:
Tweet:
Tweet:
यापूर्वी सुद्धा जुन महिन्यात गोवंडी, पवई, भांडुप या ठिकाणाहून रात्री उशिराच्या वेळेस गॅस गळतीच्या तक्रारी नारिकांनी केल्या होत्या. त्यावेळी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून या बद्दल माहिती दिली गेली होती. तर दुर्गंधी येत असल्याच्या गोवंडी परिसरातून जवळजवळ 21 तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणी अग्निशमन दल, बीपीसीएल यांनी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार तत्काळ चाचणी सुरु केली होती. तसेच प्रतिबंधात्मक उपाय ही करण्यात आले होते.