Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक

किताब अली विश्वास असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर प्रलोभन दाखवून 73 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक (Businessman Cheated) केल्याचा आरोप आहे.

Investment Scam Arreste | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: सायबर पोलिसांनी एका 37 वर्षीय कपडा कारखाना मालकास प्रलोभन आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. किताब अली विश्वास असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर प्रलोभन दाखवून 73 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक (Businessman Cheated) केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितास प्रलोभन दाखवून कमोडिटी मार्केटमध्ये 3.62 कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment Scam) करण्यास भाग पाडले अशी तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपीला सांताक्रूझ येथील न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

फसवणुकीसाठी व्हॉट्सॲप मेसेज

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, व्यावसायिकाला मे 2023 मध्ये एक व्हॉट्सॲप मेसेज आला होता. ज्यामध्ये त्याला कमोडिटी ट्रेडिंग एक्सप्लोर करण्यासाठी निमंत्रीत केले होते. व्यवसायिकाने त्यात स्वारस्य दाखवल्यानंतर त्याला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. ज्यामध्ये त्याने कमोडिटी ट्रेडिंगचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर, व्यावसायिकाने एकूण 4.15 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यासाठी दोन बँक खात्यांमधून एकूण 30 व्यवहार केले. (हेही वाचा, Indians Saving And Investment: बँकांमधील बचत घटतीय, भारतीयांचा पैसा जातोय तरी कोठे? काय आहे गुंतवणूक फंडा?)

सायबर पोलिसांकडून Technical Intelligence वापरुन गुन्ह्याची उकल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने व्यावसायिकाला त्याच्या गुंतवणुकीवर नजर ठेवण्यासाठी आणि व्हर्च्युअल वॉलेटमध्ये कथित नफा कमावण्याची लिंक दिली आणि त्याचा विश्वास संपादन केला.. हा विश्वास दृढ करण्याच्या प्रयत्नात आरोपीने व्यावसायिकाच्या खात्यात 53.6 लाख रुपये 'प्रॉफिट' जमा केले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये, जेव्हा व्यावसायिकाने नफा आणि गुंतवणुकीची मागणी केली तेव्हा आरोपीने त्याला टाळण्यास सुरुवात केली. त्यानंततर व्यवसायिकाने आपली गुंतवणूक आणि शिल्लख रक्कम पाहण्यासाठी ऑनलाईन खाते तपासले असता त्याचे ऑनलाईन लॉकरच गायब झाल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे व्यवासायिकाच्या लक्षात आल्यावर त्याने सायबर पोलीस विभागासी संपर्क साधून तक्रार केली. ज्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक बुद्धिमत्तेचा उपयोग करून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी तक्रारदाराचे पैसे ज्या बँक खात्यात जमा केले होते ते शोधून काढले. (हेही वाचा, ‘Online Trading Scam’ बाबत सजग रहा; Cyber Crime Police कडून अ‍ॅड्व्हायजरी जारी)

पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवला आणि तापसा सुरु केला. तपासादरम्यान तांत्रिक बुद्धिमत्तेचा उपयोग करून आरोपीने तक्रारदाराचे पैसे ज्या बँक खात्यात जमा केले होते ते खाते शोधून काढले. पोलिसांनी सांगितले की, रुपाली फॅशन्सच्या नावाखाली विश्वास यांचे एक खाते होते, ज्यामध्ये 39.3 लाख रुपये वळते झाले होते. तसेच, काही रक्कम बिहारच्या एका बँकेत वळती करण्यात आल्याचेही तपासात पुढे आले. या दुसऱ्या खात्याची सध्या चौकशी सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, पोलिसांनी फसवणूक केलेल्या रकमेशी जोडलेली 330 बँक खाती गोठवली आहेत, ज्यात 2.2 कोटी रुपये आहेत.