IPL Auction 2025 Live

Mumbai: गोवंडीत कचरा वेचणाऱ्याला महिलेला बुलडोझरने चिरडले; चालकाला अटक

त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. शहनाजला ताबडतोब राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai: गोवंडीतील देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ शुक्रवारी सकाळी कचरा वेचक (Woman Waste Picker) म्हणून काम करणाऱ्या शहनाज खान (Shehnaz Khan) या 32 वर्षीय महिलेचा बुलडोझर (Bulldozer) च्या धडकेने मृत्यू झाला. रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या शहनाज खानचा ड्युटीवर असताना अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहनाज काम करत असताना कचरा गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेला बुलडोझर तिच्यावर आदळला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. शहनाजला ताबडतोब राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. फैजान शेख असे बुलडोझर चालकाचे नाव असून तो आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. (हेही वाचा - Mumbai Accident: मुंबईत भरधाव ट्रकची 4 दुचाकींना धडक, पाच जण गंभीर जखमी)

राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय व्यावसायिकांनी खान कुटुंबीयांना सांगितले की, शहनाजच्या दुखापतींची तीव्रता आणि अपघातामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शहनाजचा मृत्यू झाला. पीडितेच्या बहिणीने समीनाने तत्काळ शिवाजी नगर पोलिसात जाऊन शेखविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी त्याच दिवशी शेखला अटक केली. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304 ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) तसेच कलम 134 (अ) (जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत न देणे) आणि 134 (ब) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.