Gangster Chhota Rajan: गँगस्टर छोटा राजन याच्यासह तिंघांना दोन वर्षांची शिक्षा, पनवेल येथील बिल्डरला खंडणी मागितल्याचे प्रकरण
त्यांची नावे सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या, सुित विजय म्हात्रे आणि छोटा राजन अशी आहेत. पोलीस अद्यापही एजंट परमानंद ठक्कर यांचा शोध घेत आहेत. पोलिसांजवळ सीसीटीव्ही फुटेजही आहे.
गँगस्टर छोटा राजन (Gangster Chhota Rajan) यास मुंबई सीबीआय स्पेशल कोर्टाने (CBI Court) आज दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पनवेल येथील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकावून 26 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी दाखल खटल्यात न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. प्राप्त माहितीनुसार सन 2015 मध्ये नंदू वाजेकर यांनी पुणे येथे एक जमीन भूखंड खरेदी केला होता. या व्यवहारापोटी एजंट परमानंद ठक्कर (जो सध्या फरार आहे) याला 2 कोटी रुपये कमिशन रुपात देण्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर ठक्कर याने छोटा राजन याच्याशी संपर्क साधला. ठक्कर याच्या सांगण्यावरुन छोटा राजन याने बिल्डरला धमकावून 26 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप होता.
अधिक माहिती अशी की, परमानंद ठक्कर याच्या सांगण्यावरुन छोटा राजन याने त्याच्या काही खास साथिदारांना वाजेकर याच्या कार्यालयात पाठवले. त्यांनी वाजेकर यांना धमकी देण्यास सुरुवात केली. छोटा राजनच्या साथिदारांनी दोन कोटी रुपयांच्या बदल्यात वाजेकर याला 26 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच, ही रक्कम न दिल्यास वाजेकर यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. गुंडांच्या धमकीला घाबरुन वाजेकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी वाजेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात एकूण चार आरोपी आहेत. त्यांची नावे सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या, सुित विजय म्हात्रे आणि छोटा राजन अशी आहेत. पोलीस अद्यापही एजंट परमानंद ठक्कर यांचा शोध घेत आहेत. पोलिसांजवळ सीसीटीव्ही फुटेजही आहे. या फुटेजमध्ये आरोपी हे तक्रारदाराच्या कार्यालयात गेल्याचे दिसते. तसेच, छोटा राजनही बिल्डरला धमकावताना दिसतो आहे. (हेही वाचा, कानपुर मध्ये Chhota Rajan, Munna Bajrangi यांच्या नावे पोस्टल तिकीट जाहीर, टपाल मास्टर यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)
छोटा राजन याला भारतात आणण्यात भारतीय पोलिसांना यश आले आहे. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर विविध खटले सुरु आहेत. त्याच्यावर असलेले सर्व गुन्हे हे सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. सध्या त्याला ज्या खटल्यात शिक्षा झाली ते प्रकरणही सीबीआयकडे हस्तांतरीत करण्या आले होते.