Gadhinglaj Shocker: जवान पतीचे हातपाय हातपाय बांधले, विष पाजले; पत्नी आणि प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल, गडहिंग्लज तालुक्यातील घटना
अमर देसाई असे या जवान तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज (Gadhinglaj) तारुक्यातील राहाणारा होता आणि जम्मू कश्मीर येथे लष्करात होता. पत्नी आणि तिच्या प्रियकर (Wife and Boyfriend)अशा दोघांनी मिळून अमर याच्यावर 18 जुलै रोजी विषप्रयोग केला.
भारतीय लष्करात जवान (Jawan) असलेल्या तरुणाची प्रदीर्घ काळ मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. अमर देसाई असे या जवान तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज (Gadhinglaj) तारुक्यातील राहाणारा होता आणि जम्मू कश्मीर येथे लष्करात होता. पत्नी आणि तिच्या प्रियकर (Wife and Boyfriend)अशा दोघांनी मिळून अमर याच्यावर 18 जुलै रोजी विषप्रयोग केला. तो झोपेत असताना त्याचे हात पाय बांधून त्याला विष पाजण्यात आले होते. दरम्यान, शेजाऱ्यांनी त्याला मदत करत रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय उपचारांना त्याचे शरीर प्रतिसाद देऊ शकले नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी त्याची पत्नी आणि प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध
अमर देसाई हा तरुण जम्मू-कश्मीर येथे कर्तव्यास होता. नुकताच तोच गावी सुट्टीवर आला होता. त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान, घरात झोपला असताना त्याची पत्नी आणि तिच्या प्रयकराने कथीतरित्या त्याचे हात पाय बांधले आणि त्याला जबरदस्तीने विष पाजले. ज्यामुळे त्याच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला. महिलेने तिच्या पतीवर विषप्रयोग केल्याची माहिती शेजाऱ्यांना कळताच ते मदतीला धावले. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून अमर यास बाहेर काढले. त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्बल 15 दिवस उपचार करुनही त्याची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याला यश येऊ शकले नाही. अखेर जवानाचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Viral Video: पत्नीच्या मृत्यूनंतर, पतीने तिच्या स्मरणार्थ बांधले मंदिर, दररोज करतात पूजा, पाहा व्हिडीओ)
पत्नीचा व्यभिचार, पतीचा मृत्यू
अमर देसाई यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर अद्यापही बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय जवान तरुणाचा पत्नीच्या व्यभिचारामुळे हाकनाक जीव गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. लष्करात जवान असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे प्राण गेल्याने गावकऱ्यांच्या मनाला चटका लागला आहे. दरम्यान, देसाई यांच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती शेजाऱ्यांना कळली. शेजाऱ्यांनी तातडीने पावले टाकत त्यांना मदत पुरवली. त्यामुळे त्यांच्यावर तातडीचे वैद्यकीय उपचार झाले. परिणामी ते किमान 15 दिवस तरी जीवंत राहू शकले. अन्यथा त्यांचा तत्पूर्वीच मत्यू झाला असता, अशी गावात चर्चा आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाली नाही. मात्र, पोलीस आरोपींच्या मागावर असल्याची माहिती आहे.