Fuel Home Delivery: मुंबईकरांना आता CNG भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही; लवकरच इंधनाची होणार होम डिलिव्हरी

शहरात सर्वत्र सीएनजी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता सीएनजीची होम डिलिव्हरी सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.

(Photo Credit - PTI)

अनेकवेळा गाडीमध्ये सीएनजी (CNG) भरण्यासाठी लांबच लांब रांगांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे बराच वेळ वाया जातो. परंतु आता मुंबईत (Mumbai) एकच कॉलवर सीएनजीची होम डिलिव्हरी (CNG Home Delivery) होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत लवकरच लोकांना त्यांच्या दारात सीएनजी पोहोचवला जाणार आहे. ऊर्जा वितरण स्टार्टअप ‘द फ्युएल डिलिव्हरी’ने महानगर गॅस लिमिटेडसोबत शहरात मोबाईल सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी स्वारस्य पत्रावर स्वाक्षरी केली आहे. या मोबाईल सीएनजी स्टेशनच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या दारात इंधन पोहोचवले जाईल.

सीएनजीवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता लोकांना सीएनजी भरण्यासाठी पंपावर तासनतास थांबावे लागणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एमजीएलकडून मुंबईत दोन मोबाईल सीएनजी स्टेशन चालवण्याची परवानगी मिळाली आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील सायन आणि महापे येथून ही सेवा सुरू होणार आहे आणि हळूहळू शहराच्या इतर भागांमध्येही विस्तारली जाईल.

द फ्युएल डिलिव्हरीचे संस्थापक-सीईओ रक्षित माथूर म्हणाले, ‘देशभरात घरोघरी डिझेल यशस्वीरीत्या पोहोचवल्यानंतर, आम्ही सीएनजीच्या घरोघरी वितरणाची घोषणा करून एक पाऊल पुढे टाकत आहोत.’ कंपनीच्या निवेदनानुसार, एकट्या मुंबईत सुमारे पाच लाख सीएनजी वाहने आहेत आणि दरवर्षी 43 लाख किलो सीएनजीचा वापर केला जातो. या वाहनांसाठी मुंबईत केवळ 223 सीएनजी स्टेशन असताना, हे मोबाईल सीएनजी स्टेशन्स मोठा दिलासा देणारे ठरणार आहेत. (हेही वाचा: Mumbai: 42% वृद्धांचे उत्पन्न जगण्यासाठी अपुरे, तर 72% वृद्ध आपल्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून- HelpAge India)

सध्या मुंबईमध्ये सीएनजी पंपांची संख्या मर्यादित आहे. शहरात सर्वत्र सीएनजी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता सीएनजीची होम डिलिव्हरी सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif