Petrol Diesel Price Today: इंधनाचा भडका! आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले

तर डिझेलचा दर वाढून 100.94 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6. 84 रुपयांची वाढ झाली आहे.

Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

आता पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून महागाईचा भडका रोजच जाणवत आहे. आजही पेट्रोल-डिझेलमध्ये (Petrol-Diseal) 80 पैशांंची वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले. मुंबईत (Mumbai) डिझेलने आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत (Delhi) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाल्यानंतर ते 101.81 रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.94 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6. 84 रुपयांची वाढ झाली आहे.

अशाप्रकारे दिल्लीत 10 दिवसांत पेट्रोल 6.40 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर डिझेलही 6 रुपये 40 पैशांनी महागले आहे. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 101.81 रुपये आणि डिझेलची किंमत 93.07 रुपये आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी राजधानीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर होता. (हे देखील वाचा: Refinery Project: रिफायनरी प्रकल्प कोकणातच, फक्त जागेत होणार बदल!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; आदित्य ठाकरे यांची माहिती)

Tweet

आता 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागले. 24 मार्चला त्यात कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढले. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले. 28 मार्च रोजी पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले. 29 मार्च रोजी पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी वाढले, 30 मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आणि आजही दिलासा नाही, पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.