Fresh Guidelines For International Travellers at Mumbai International Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर परदेशातून येणार्‍यांना अशी असेल नवी नियमावली

त्यावरही बीएमसीने आज सविस्तर स्पष्टीकरण देत त्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट केले आहे.

Passenger being screened at airport (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) उतरणार्‍या परदेशी प्रवाशांना असलेल्या नियमावलीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता पण आज मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) त्यावर स्पष्टीकरण देत नवी नियमावली जारी केली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना मुंबई विमानतळावर रॅपिड आरटीपीसीआर टेस्ट (Rapid RTPCR Test)  करावी लागणार आहे. त्याच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रिपोर्टवर पुढील निर्णय घेतले जाणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी नियमावली ट्वीट करत अनेकांचा संभ्रम आज दूर केला आहे.

परदेशातून मुंबईत येणार्‍यांसाठी काय असेल नियमावली?

आदित्य ठाकरे यांचं ट्वीट  

भारतामध्ये कोविड 19 चा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ची दहशत पाहता काही देश हे हाय रिस्क लिस्ट मध्ये आहे. तेथून येणार्‍या प्रवाशांसाठी काही नियम आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी मुंबई सह काही विमानतळांवर उतरताना कोविड टेस्टच्या प्रीबुकिंगचा पर्याय देखील बंधनकारक केला आहे.  मुंबई सह 6 मेट्रो स्ट्रेशन मध्ये 20 डिसेंबर पासून ‘At-Risk’ राष्ट्रांमधून येणार्‍या प्रवाशांना RT-PCR टेस्ट साठी प्री बुकिंग बंधनकारक.

सोशल मीडीयामध्ये एका युके मधून आलेल्या आणि मुंबई मध्ये उतरलेल्या प्रवाशाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यावरही बीएमसीने आज सविस्तर स्पष्टीकरण देत त्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट केले आहे.

बीएमसीचं स्पष्टीकरण  

 

महाराष्ट्रामध्ये सध्या ओमिक्रॉनचे रूग्ण अधिक आहेत.  सध्या टेन्शन वाढवणार्‍या ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. राज्यात  653 ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif