IPL Auction 2025 Live

Pune Fraud: पुण्यातील अभियंत्याची 49 लाख रुपयांची फसवणूक, पार्ट टाईम कामाचे आमिष दाखवत केली फसवणूक

हिंजेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार केली आहे. व्हिडिओला लाईक केल्यावर पैसे मिळणार असल्याचे सांगितले यातून त्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

PART TIME JOB SCAM- Photo credit- pixabay

Pune Fraud:  पार्ट टाईम काम करण्याचे लाखो जाहिरात सोशल मीडियालवर येत असतात. यातल्या काही जाहिराती ह्या फक्त फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवल्या जातात. सर्व  सामान्य जनता ह्याला बळी पडते आणि आयुष्यभराची कमाई देखील पणाला लावतात. अश्याच एका पार्ट टाईम कामाची जाहिरातील बघून पुण्यातील एका अभियंत्यांची फसवणूक केली. त्याला 49 लाखांचा गंडा लावला आहे. झटपट पैसे कमवण्याच्या नादात त्याची फसवणूक झाली. आपल्या हातातून  सर्व निघून गेल्यावर त्यांने पुणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

युट्यूब व्हिडिओला लाइक करण्याचे पैसे देणार असल्याचे सांगितले. ही घटना 28 मार्च ते 28 एप्रिल दरम्यान पुणे येथे घडली.  तक्रार दोन महिन्यांनंतर नोंदवण्यात आली आहे. स्नेहासिंग हृदयनारायण सिंग (वय 35, रा. हिंजवडी, पुणे ) असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरवातीला त्याला ह्या कामाचे 150 ते 300 रुपयांपर्यंत पैसे मिळत होते. टेलिग्रामाची लिंक दिल्यानंतर ऑनलाइन कामे मिळू लागली. काही दिवसांत त्याला गुंतवणूकीचे फंडे सांगणात आले. ह्या गुंतवणूकीतून त्याला चांगली रक्कम मिळेल याचे आमिष दाखवत त्याला गुंतवणूक करण्यास सांगितले.

आधूरी गांगूली नावाची व्यकी त्याची फसवणूक करत असल्याचे समोर आले. गुंतवणूक केल्यास त्याला 30 टक्के मिळणार असल्याचे सांगितले. हळू हळू त्याच्या गुंतवणूकीतून 49 लाख रुपयांचा गंडा लावला. बरेच दिवस वाट पाहिल्यानंतरही त्याला पैेसे मिळाले नाही. त्याची फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यावर त्याने लगेच पोलिसांकडे धाव घेतला. ह्या संदर्भात पोलीसांनी त्या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या IPC कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत कलमही लावण्यात आले आहे.