Pune: पुण्यात पाण्याचा पंप दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून चौघांचा मृत्यू

पिडीत आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गुंजवणी नदीत सिंचन पंप बसवत होते.

Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pune: पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यात गुरुवारी दुपारी नदीत पाण्याचा पंप बसवत असताना विजेचा धक्का (Electric shock) लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. पीडितांमध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या निगडे गावात ही घटना घडली. पिडीत आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गुंजवणी नदीत सिंचन पंप बसवत होते.

विठ्ठल मालुसरे (वय, 45), त्यांचा मुलगा सनी मालुसरे (वय, 26), त्यांचे नातेवाईक अमोल मालुसरे (वय, 36) आणि आनंदा जाधव (वय, 55) अशी मृतांची नावे आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या अधिकाऱ्यांनीही या घटनेचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Mumbai Police: भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या मुलाची सुटका, मुंबईतील कांजूरमार्ग पोलिसांच्या तपासाला 11 दिवसांनी यश)

राजगड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, 'चारही मृतदेह सापडले आहेत. महावितरणचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. आम्ही मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांच्या क्रमाची चौकशी सुरू केली आहे.' (हेही वाचा - Cat News & Pune Crime : मांजर मेल्याचा राग, मालकाकडून पशुवैद्यकीय डॉक्टरला मारहाण, पायाला फ्रॅक्चर)

पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) भाऊसाहेब ढोले म्हणाले, 'प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अलीकडेच पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे चौघेजण नदीत बसवलेला पंप पुढे नदीपात्रात हलवत होते. पंपासाठी वापरल्या जाणार्‍या वीज पुरवठा केबलमध्ये अनेक कट होते. जे स्टिकिंग टेपने झाकलेले होते. महावितरणचे विद्युत निरीक्षक या घटनेची चौकशी करतील आणि अहवाल सादर करतील. ज्याच्या आधारे आम्ही पुढील कारवाई करू,' असं ढोले यांनी सांगितलं.