माजी मंत्री Kripashankar Singh बुधवारी करणार BJP मध्ये प्रवेश; जाणून घ्या कशाप्रकारे बदलू शकते महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सिंह यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला होता
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सिंह यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. सिंग यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमधील मुंबई महानगरपालिकेचे (BMC) समीकरण बदलू शकेल, असा विश्वास आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील रहिवासी कृपाशंकर सिंह, कॉंग्रेसकडून फार जास्त काळ राजकारणामध्ये वावरले आहेत. कॉंग्रेस सोडल्यानंतर ते आतापर्यंत इतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत.
मात्र, फक्त निवडणुका जिंकण्याच्या आशेवर त्यांना भाजप किंवा शिवसेनेत जायचे आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. परंतु कृपाशंकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकादेखील लढवल्या नाहीत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचे समजते. काही काळ ते मुंबईत माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सतत संपर्कात आहेत. आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी दुपारी 12 वाजता ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या पुढील वर्षी होणार्या निवडणुका लक्षात घेता कृपाशंकर सिंग यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना अगदी काही जागांद्वारे मागे राहिली होती. यावेळी भाजपला बीएमसीला ताब्यात घेऊन शिवसेनेला धडा शिकवायचा आहे. विशेषत: गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने ज्या प्रकारे आपली बाजू बदलली आहे, त्याचा बदला भाजपला घ्यायचा आहे.
मुंबईत असे अनेक प्रभाग आहेत जिथे हिंदी भाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावतात. मुळात हा वर्ग काँग्रेसशीच संबंधित आहे. 2014 नंतर मोदींमुळे हिंदी भाषिक लोकांचा कल भाजपकडे आहे, परंतु मुंबई भाजपमध्ये हिंदी भाषिकांचा प्रभावी चेहरा नसल्यामुळे ते पूर्णपणे भाजपशी जोडले गेले नाहीत. आता कृपाशंकर यांना आणून भाजपला ही उणीव दूर करायची आहे. मुंबईतील जवळपास 1.25 कोटी लोकसंख्येपैकी हिंदी भाषिकांची संख्या सुमारे 40 लाख आहे. मूळचे रायबरेलीचे रहिवासी डॉ. राम मनोहर त्रिपाठी यांच्यानंतर केवळ कृपाशंकर सिंह हे निर्विवाद हिंदी भाषिक नेते म्हणून उदयास आले आहेत. (हेही वाचा: 'कालची घटना अतिशय लाजिरवाणी होती, ते पाहून मान शरमेने खाली गेली'- CM Uddhav Thackeray)
दरम्यान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना कृपाशंकर सिंह यांच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागा जिंकण्यात यश आले होते. त्यापैकी पाच जागा कॉंग्रेसने जिंकल्या आणि एक मित्रपक्ष राष्ट्रवादीने जिंकली. ते मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मुंबईतील 34 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)