PMC बॅंकेचे माजी चेअरमन Waryam Singh आज मुंबई पोलिसांच्या EOW समोर स्वाधीन होणार
PMC बॅंकेचे माजी चेअरमन Waryam Singh यांनी मुंबई पोलिसांच्या EOW विभागाला पत्र लिहून आज (5 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होईन अशी माहिती दिली आहे.
PMC बॅंकेचे माजी चेअरमन Waryam Singh यांनी मुंबई पोलिसांच्या EOW विभागाला पत्र लिहून आज (5 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होईन अशी माहिती Mumbai Mirror च्या खास वृत्तामध्ये दिली आहे. आज EOW ने पीएमसी बॅंकेचे एमडी जॉय थॉमस यांचे बॅंक खाते फ्रीझ केले आहे. सिंह यांनी पीएमसी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशी आणि तपासणीमध्येही पुर्ण सहाय्य करेन अशी हमी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये जॉय थॉमस यांच्यासोबतच Waryam Singh यांचे देखील नाव आहे. HDIL आणि PMC बॅंकेकडून झालेल्या आर्थिक घोटाळ्यात सुमारे 4355 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई मिररच्या बातमीनुसार, सिंह हे अंधेरी भागात राहतात आणि त्यांनी पत्राद्वारा पराग मानेरे यांना चौकशी दरम्यान सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. माजी सीएमडी जॉय थॉमस यांना पीएमसी बँक प्रकरणात 17 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ANI Tweet
PMC bank matter: The Economic Offences Wing (EOW) freezes accounts of Joy Thomas, the suspended Managing Director of the Punjab & Maharashtra Cooperative Bank. https://t.co/CAiGEkbf55
ईडीकडून मागील काही दिवसांत मुंबईत सहा विविध भागांमध्ये छापा टाकला आहे. त्यानुसार FIR दाखल करण्यात आली आहे. पीएमसी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं टाकण्यात आली आहे. सुरूवातीला 1000 प्रतिदिन पैसे काढण्याची मुभा 10,000 रूपयांपर्यंत वाढवून आता 25,000 करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)