वनमंत्री संजय राठोड येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवीत येणार, येत्या मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे संजय राठोड सहकुटूंब पोहरादेवीत येणार आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आले. त्यानंतर संजय राठोड अचानक नाहीसे झाले. त्यामुळे प्रसारमाध्यमांसह सर्वच जनता संजय राठोड यांची उत्सुकतेने वाट पाहत आहे. सलग 12 दिवस नॉट रिचेबल झालेले संजय राठोड अखेर सर्वांसमोर येणार आहेत. आज धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. या बैठकीत महंत जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांनी याबाबत माहिती दिली. येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे संजय राठोड सहकुटूंब पोहरादेवीत येणार आहे.
संजय राठोड येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवीत येणार असून त्याच दिवशी ते पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे. येत्या सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.हेदेखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन नारायण राणे यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
पोहरादेवीत विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली. ते म्हणाले आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे. हे वास्तव आहे. या आधी धनंजय मुंडे यांच्याबबतही असेच घडले. सुरुवातील खूप चर्चा झाली. राजीनामा मागण्यात आला. नंतर त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीनेच आपली तक्रार मागे घेतली. त्या वेळी जर त्यांचा राजीनामा घेतला असता तर ते अत्यंत चुकीचे झाले असते, असेही अजित पवार म्हटले.
कोणत्याही प्रकरणात केवळ आरोप झाले म्हणून कोणत्याही व्यक्तीला पदावरुन हटवणे योग्य नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोवर कोणत्याही व्यक्तीला दोषी धरता येऊ शकत नाही. ते शिवसेना नेते आहेत. त्याुमळे त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे पक्षाने ठरवायचं. पण, एक त्रयस्त व्यक्ती म्हणून माझं हे मत आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.