Hari Narke यांच्या स्मरणार्थ 5 लाखांची शिष्यवृत्ती; दरवर्षी 9 ऑगस्टला होणार वितरण
हरी नरके यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लेक अभिनेत्री प्रमिती नरके आहे.
ज्येष्ठ विचारवंत, प्राध्यापक हरी नरके (Hari Narke) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा मानस मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. डॉ. हरी नरके यांच्या नावाने 5 लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शोध पत्रकार, समाजसुधारक, विद्यार्थी यांना 5 लाखांपर्यंत मदत मिळणार असल्याचं यामधून जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना केली जाणार आहे. गरजू उमेदवारांना शोधून त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचं भुजबळांनी जाहीर केले आहे. समता परिषदेकडून 9 ऑगस्ट दिवशी या शिष्यवृत्तीचं वाटप होणार आहे.
दरम्यान मराठी ही संस्कृत, तेलगू आणि कन्नड प्रमाणे अभिजात भाषा आहे यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या कामाचा वसा पुढेही कायम ठेवला जाईल असं भुजबळांनी सांगताना त्यांच्या सार्या पुस्तकांचं एमईटी मध्ये ग्रंथालय सुरू केले जाईल असेही ते म्हणाले आहेत.
समता परिषदेच्या बैठकीला येत असताना 9 ऑगस्ट दिवशी पुणे- मुंबई प्रवासादरम्यान हरी नरके यांना त्रास जाणवू लागला आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हरी नरकेंच्या मृत्यूच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आंबेडकर, फुलेंचे विचार रूजवण्यासाठी ते काम करत होते. नक्की वाचा: Hari Narke Dies: प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांच्या निधनावर शरद पवार ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक .
हरी नरके यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लेक अभिनेत्री प्रमिती नरके आहे. 9 ऑगस्ट दिवशी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतच हरी नरके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज मुंबईमध्ये त्यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आले होते.