PM National Bravery Award 2021: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील 5 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

कठीण प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते.

Prime Minister National Bravery Award 2021 (Photo Credit: Devendra Fadnavis Tweet)

दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day) आदल्या दिवशी भारतातील 16 वर्षाखालील सुमारे 25 शूर बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (Prime Minister National Bravery Award 2021) दिला जातो. कठीण प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या बालकांच्या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) पाच जणांचा समावेश आहे. ही महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात. देशातील शूर आणि धाडसी मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील पाच मुलांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यात कामेश्वर वाघमारे (नांदेड), कमया कार्तिकीयन (मुंबई), अर्चित पाटील (जळगाव), सोनीत सिसोलेकर (पुणे), श्रीनाभ अग्रवाल (नागपूर) यांचा समावेश आहे. हे देखील वाचा- लातूरची Shrishti Jagtap प्रजासत्ताक दिनी करणार 24 तास लावणी नृत्य; आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा निश्चय

ट्वीट-

दिल्ली येथील रामलीला मैदानावर 2 ऑक्टोबर 1957 रोजी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरु होता. हा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू पाहत होते. दरम्यान, त्याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली होती. तेव्हा हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ 14 वर्षांच्या मुलाने स्वतःकडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली होती. त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना त्याचे खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली.पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif