NCP Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Sharad Pawar | Photo Credit- X

NCP Sharad Pawar Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. महाविकास आघाडीचे तीन पक्ष 85-85 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. बुधवारी शिवसेनेच्या यूबीटीने 65 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली होती.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर (NCP Sharad Pawar Candidate List) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (हेही वाचा - Sameer Bhujbal Resigns: महायुतीला मोठा झटका! समीर भुजबळ यांचा राजीनामा; नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढणार अपक्ष निवडणूक)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत 'या' उमेदवारांना संधी -

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात आता शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif