भायखळा परिसरातील लाकडाच्या वखारीला भीषण आग; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु
संत सावंत मार्गावर ही लाकडाची वखार आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, वखारीतील वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
मुंबई (Mumbai) येथील भायखळा (Byculla) परीसरातील लाकडाच्या वखारीला आग लागल्याची माहितीसमोर आली आहे. संत सावंत मार्गावर ही लाकडाची वखार आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, वखारीतील वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
मुस्तफा मार्केटमधील लाकडाच्या वखारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि १२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. लाकडाला आग असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशामुळे लागली अद्याप याची माहिती समोर मिळाली नाही. हे देखील वाचा-Mumbai Fire: भिंवडी येथील चंदन पार्क परिसरात फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचं नुकसान झाल्याची भीती
आग लागण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. मुंबई शहरात गेल्या काही वर्षापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.