Buldhana Bus Accident: टायर फुटल्यानंतर बसमधील ज्वलनशील वस्तूंमुळे लागली आग; अपघातग्रस्त बस मालकाची प्रतिक्रिया
बस चालक दानिश हा ड्रायव्हिंगचा अनुभवी होता. आम्हाला माहिती मिळाली आहे की, टायर फुटल्यानंतर बस रोड डिव्हायडरला धडकली. बसमध्ये ज्वलनशील वस्तू असल्याने बसला आग लागली, असं वीरेंद्र दारणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
Buldhana Bus Accident: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा बसचा भीषण अपघात (Accident) झाला. नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या बसला आग (Fire) लागली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अनेक जण जखमी झाले. जळत्या बसमधून कसेबसे बाहेर पडून अनेकांचे प्राण वाचले. या भीषण दुर्घटनेतून केवळ आठ जण बचावले. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती बसचे मालक वीरेंद्र दारणा यांनी दिली. बसमध्ये ज्वलनशील वस्तू असल्याने आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही 2020 साली बस खरेदी केली. बस चालक दानिश हा ड्रायव्हिंगचा अनुभवी होता. आम्हाला माहिती मिळाली आहे की, टायर फुटल्यानंतर बस रोड डिव्हायडरला धडकली. बसमध्ये ज्वलनशील वस्तू असल्याने बसला आग लागली, असं वीरेंद्र दारणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. (हेही वाचा -Buldhana Accident: बुलढाणा बस अपघाताप्रकरणी गाडीचा वाहक आणि चालक ताब्यात)
राज्य पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात तीन मुलांसह 26 जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले, त्यामागे टायर फुटणे हे मुख्य कारण आहे. अपघातातून बचावलेल्या बसच्या चालकाने सांगितले की, टायर फुटल्यानंतर गाडी पलटी झाली आणि नंतर आग लागून 25 जण जागीच ठार झाले आणि 8 जण जखमी झाले.
बुलढाण्याचे एसपी सुनील कडासणे यांनी एएनआयला सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 मुले असून उर्वरित प्रौढ आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बस यवतमाळहून पुण्याला जात असताना बुलढाणा येथील समृद्धी द्रुतगती मार्गावर पहाटे दीडच्या सुमारास अपघात झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा बसमधील सर्व प्रवासी झोपले होते. त्यामुळे बरेच लोक बसच्या बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. बसला आग लागल्यानंतर बाहेर पडू शकलेले काही लोक कसेबसे वाचले आणि बाकीचे मरण पावले.