Thane: वागळे इस्टेटमधील बंद कंपनीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे येथील आरडीएमसीचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, आम्हाला गुरुवारी दुपारी 2.50 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षात एका ग्राउंड प्लस दोन मजल्यांच्या इमारतीमधील बंद कंपनीत आग लागल्याची माहिती मिळाली.

Fire | Pixabay.com

Thane: ठाण्यातील वागळे इस्टेट (Wagle Estate) येथील एका बंद कंपनीला दुपारी 2.50 च्या सुमारास भीषण आग (Fire) लागली. याबाबत RDMC प्रमुखांनी गुरुवारी माहिती दिली. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

ठाणे येथील आरडीएमसीचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, आम्हाला गुरुवारी दुपारी 2.50 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षात एका ग्राउंड प्लस दोन मजल्यांच्या इमारतीमधील बंद कंपनीत आग लागल्याची माहिती मिळाली. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक-16 मानबा फायनान्सच्या कार्यालयासमोर घडली. (हेही वाचा -Janmashtami 2023: दहीहंडी साजरी करताना मुंबईत 35 गोविंदा जखमी, 22 जणांवर उपचार सुरू)

कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्ष एक अग्निशमन वाहन, दोन पाण्याचे टँकर, एक जंबो वॉटर टँकर आणि एक बचाव वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत एक जण जखमी झाला आहे, असंही तडवी यांनी सांगितलं.

तडवी यांनी पुढे सांगितलं की, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.