Mumbai: मुंबईतील औद्योगिक वसाहतीमधील इमारतीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मंगळवारी सकाळी मुंबईतील औद्योगिक वसाहती (Industrial Estates In Mumbai) मधील दोन मजली इमारतीत आग (Fire) लागली. दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरळीच्या गांधी नगर येथील महापालिका औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीची माहिती मिळताच मुंबई पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा - Mumbai Agra Accident: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत एका मजूराचा मृत्यू)

दरम्यान, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील शारजाह येथे एका उंच इमारतीला लागलेल्या आगीत दोन भारतीयांचा मृत्यू झाला. या दोन मृतांमध्ये मुंबईतील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे. अल नहदा परिसरात 750 घरे असलेल्या नऊ मजली निवासी टॉवरमध्ये गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत तीन परदेशी लोकांचाही मृत्यू झाला, तर 44 जण जखमी झाले.

तथापी, या आगीत मृत्यू झालेल्या दोन भारतीय बळींपैकी एकाचे नाव मायकेल सत्यदास असे असून ते साऊंड इंजिनियर होते. तसेच मुंबईतील मृत महिलेचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते.