Mumbai Agra Accident: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत एका मजूराचा मृत्यू
मुंबई आग्रा महामार्गावर एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ दुरुस्तीचे काम करत असताना मजुरांना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने धडक दिली.
Mumbai Agra Accident: मुंबई आग्रा (Mumbai Agra) महामार्गावर एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ दुरुस्तीचे काम करत असताना मजुरांना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने धडक दिली. या भीषण धडकेत एका मजूराचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर दोन मजूर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -नागपूरमध्ये विचित्र अपघात, भरधाव ट्रकची 12 वाहनांना धडक, 4 जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ८ एप्रिलच्या पहाटे घडला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाला होता. मुंबई आग्रा महामार्गवर सोनगीर टोल नाक्याजवळ टेम्पोने मजूरांना धडक दिली. सोनगीरकडून धुळ्याकडे वाळू भरून जाणाऱ्या डंपरने डांबर यंत्राला जोरदार धडक दिली. यंत्रणाच्या आत मजूर काम करत होते. अपघातात सुभाष साहेबराव बाबर (वय वर्ष 45), गोपाळ बाळासाहेब मुळे अन्य एका मजूराला डंपरने उडवले आहे. अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडल्याेन सुभाष याचा जागीच मृत्यू झाला.
सर्व मजूर जालना जिल्ह्यातील पारनेर येथील रहिवासी आहे. अपघातात दोन मजूरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी गोपाळ यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होचा. भरधाव डंपर अनियंत्रित झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. डंपर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

