Sameer Wankhede यांच्या विरूद्ध कोपरी पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल

हा परवाना 27 ऑक्टोबर 1997 ला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यावर कारवाई करत तो रद्द करण्यात आला आहे.

Sameer Wankhede | (Photo Credit: ANI)

एनसीबी मुंबईचे माजी डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) माहितीनुसार हा गुन्हा ठाण्यात कोपरी पोलिस ठाण्यात (Kopari Police Station) दाखल झाला आहे. वय लपवून हॉटेलचा परवाना घेण्याची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे आली होती त्यानुसार कारवाई करताना हा फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांच्या नावाने नवी मुंबईतील वाशी मध्ये बार आणि रेस्टॉरंट आहे. हा परवाना 27 ऑक्टोबर 1997 ला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यावर कारवाई करत तो रद्द करण्यात आला आहे. या परवाना अंतर्गत परदेशी आणि देशी बनावटीची दारू विकण्यास मुभा असते. नक्की वाचा: NCB चे माजी झोनल डायरेक्टर Sameer Wankhede यांना मोठा दिलासा; वानखेडे हे अनुसूचित जातीचेच आहेत - SC आयोगाची माहिती .

ANI Tweet

समीर वानखेडे हे 1996-97 मध्ये 18 वर्षांपेक्षा कमी होते. अशी व्यक्ती बार आणि रेस्टॉरंट बद्दल असे परवाने मिळवण्यास पात्र नसते. पण कागदपत्रांवर समीर वानखेडेंनी आपण 'मेजर' (18 वर्ष पूर्ण) असल्याचं दाखवत सदगुरू हॉटेलचे अ‍ॅग्रिमेंट डीड केल्याचं सांगत परवाना मिळवल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.

दरम्यान यापूर्वी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. आरक्षणाचा गैरफायदा घेत त्यांनी सरकारी नोकरी मिळवली असेही नवाबांचे आरोप आहेत.