Maharashtra Cyber Cell: बाल लैंगिक शोषण सामग्री अपलोड करणाऱ्या YouTube चॅनलवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई

सदर चॅनलने बाल लैंगिक शोषण सामग्री ( Child Sexual Abuse Material) अपलेड केल्याचा आरोप आहे.

Child Sexual Abuse | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने (Maharashtra Cyber Cell) एका यूट्यूब चॅनल (YouTube Channel) विरोधात गुन्हा दाखल केल आहे. सदर चॅनलने बाल लैंगिक शोषण सामग्री ( Child Sexual Abuse Material) अपलेड केल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये मुलगा आणि त्याच्या आईचा समावेश आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (FIR) सदर चॅनलच्या भरतातील प्रतिनिधिचेही नाव आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोग द्वारे सायबर पोलीस अधिक्षकांना 8 जानेवारी रोजी एक पत्र देण्यात आले होते. ज्यामध्ये सदर युट्युब चॅनल आणि त्यावरील सामग्री आणि झालेली कारवाई याबबत विचारणा करण्यात आली होती.

अश्लिल ट्रेण्डमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश

दरम्यान, आयोगाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, YouTube वर एक विचित्र ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यामध्ये दिलेल्या "चॅलेंज" मध्ये लोक सहभागी होत आहेत. ज्यामध्ये खास करुन महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या ट्रेण्डमध्ये महिला आणि अल्पवयीन मुले सहभागी होतात. जे अश्लिल स्वरुपाची सामग्री उपलब्ध करुन देतात. ही सामग्री युट्युब चॅनेलवर अपलोड केली जाते. NCPCR ने दिलेल्या माहितीत युट्युब चॅनेलचे नाव 'XXXX Vlogs' असून त्यावरुन अश्लिल सामग्री प्रसारित केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केलेल्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, हे युट्युब चॅनेल मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील एका ठिकाणाहून चालवले जात होते. (हेही वाचा, Boy Accidentally Hangs Himself Mimicking YouTube Reel: व्हिडिओ बनविण्याच्या नादात चुकून गळफास, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

POCSO आणि आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चाइल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूब चॅनल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने महाराष्ट्र सायबरला चाइल्ड पोर्नोग्राफीवर कंटेंट असलेल्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती दिली होती. भारतीय दंड संहिता तंत्रत्रान कायदा आणि POCSO च्या कलम 509 (शब्द, हावभाव किंवा कृती ज्याचा उद्देश महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करणे आहे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. (हेही वाचा, Mumbai Crime: मुंबईमध्ये 40 वर्षीय गुजराती चित्रपट अभिनेता आणि निर्मात्याने केला 17 वर्षांच्या मुलीचा विनयभंग; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)

एक्स पोस्ट

चाईल्ड पोर्नोग्राफी हा भयंकर गुन्हा मानला जातो. भारत आणि जगभरातील देशांमध्ये या गुन्ह्याबाबत कठोर शिक्षेची तरतूद आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्रीची निर्मिती, वितरण किंवा साठवण याचा समावेश आहे. लहान मुलांचा समावेश असलेली कोणतीही अश्लिल सामग्री, ज्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ, प्रतिमा, चित्रे, लिखीत अथवा कोणताही दृकश्राव्य, दृक अथवा श्राव्य सामग्री चाईल्ड पोर्नोग्राफी समजली जाते.