Atul Bhatkhalkar: संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; अतुल भातखळकर यांची केंद्र सरकारकडे मागणी
राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून म्हंटले होते.
राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून म्हंटले होते. यावर भाजप नेत आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या दैनिकातील लेखातून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
संजय राऊत यांनी दैनिक सामनामध्ये एक लेख लिहला आहे. या लेखातून त्यांनी फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले आहे, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ज्यात त्यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख बोरुबहाद्दर असाही केला आहे. हे देखील वाचा- UPA President: 'यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये' काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले
अतुल भातखळकर यांचे ट्विट-
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना मंगळवारी (29 डिसेंबर) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.