Thane Shocker: वडिलांनी Snapchat डाउनलोड करण्याची परवानगी नाकारली; 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन संपवलं जीवन

तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप्लिकेशन डाऊनलोड केले होते. तिच्या वडिलांनी तिला असे न करण्यास सांगितले. ज्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Thane Shocker: ठाणे (Thane) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. वडिलांनी स्नॅपचॅट (Snapchat) डाउनलोड करण्याची परवानगी नाकारल्याने 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री डोंबिवली परिसरातील निलजे येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, मुलीला तिच्या फोनमध्ये स्नॅपचॅट डाउनलोड करण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप्लिकेशन डाऊनलोड केले होते. तिच्या वडिलांनी तिला असे न करण्यास सांगितले. ज्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. (हेही वाचा - BEST Bus Driver Slapped by Commuters In Bandra: वांद्रे पूर्व भागामध्ये बेस्ट बस स्टॉप वर थांबवता पुढे नेल्याने चालकाला 3 प्रवाशांकडून मारहाण; एक जण अटकेत)

मुलीने कथितरित्या शुक्रवारी रात्री तिच्या घरातील बेडरूमच्या छताला गळफास लावून घेतला. दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना मुलीने आत्महत्या केल्याचे समजले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (हेही वाचा - Dombivli: डोंबिवली येथील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, थरकाप उडवणारा Video व्हायरल)

मोबाईल फोनच्या सवयीमुळे आत्महत्या करण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये पालकांनी मोबाईल फोन कमी वापरचा सल्ला दिल्यानंतर मुलांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी पुण्यात मोबाइल न दिल्याने दहावीतील 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif