Nashik Crime: कौटुंबिक वादात वडिलांनी केली मुलाला माराहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यु, नाशिक येथील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीव वाचवण्यासाठी वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातापायावर लोखंडी रॉडने वार केला.
नाशिक (Nahsik) मधील चांदवड तालुक्यामधील धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादावरुन मुलाचा मृत्यु झाला आहे. रविवारी कौटुंबिक जोरदार वादानंतर एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या 32 वर्षीय मुलाची हत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाटे गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा मद्यधुंद अवस्थेत सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि लग्नाबाबत वडिलांशी भांडण सुरू केले. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की आधी दारू पिणे थांबव, ज्यामुळे तो मुलगा संतपाला. यानंतर मुलाने लोखंडी रॉड उचलून वडिलांना मारहाण केली. रागाच्या भरात वडिलांनीही रॉड उचलून मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मुलगा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वडिलांविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीव वाचवण्यासाठी वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातापायावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात मुलगा हा मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. (हे देखील वाचा: Pune Road Accident: चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवे वर PMPML Bus-ट्रकची धडक; ट्राफिक जाम)
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वडिलावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी वडिल देखील जखमी असल्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल.