Barshi Stock Market Scam: शेअर मार्केट गुंतवणुकीतून परताव्याचे आमिष, बार्शी येथील कोट्यवधी रुपयांच्या 'फटे स्कॅम' प्रकरणी एकास अटक
प्रामुख्याने सोलापूरातील बार्शी येथे 'फाटे स्कॅम' (Fate Scam Barshi ) सर्वाधिक चर्चेत होता.
Solapur Barshi Froud Case: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करुन तुफान नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून अनेकांना गंडा (Stock Market Scam)घातल्याच्या तक्ररी ग्रामिण भागातून वाढत आहेत. प्रामुख्याने सोलापूरातील बार्शी येथे 'फाटे स्कॅम' (Fate Scam Barshi ) सर्वाधिक चर्चेत होता. या प्रकरणातील मख्य आरोपी असलेल्या विशाल फटे याचे वडील अंबादास फटे आणि वैभव फटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील एका आरोपीला पहिली अटक झाली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने आरोपीस सांगोला येथून मध्यरात्री अटक केल्याचे वृत्त आहे. कोट्यवधी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात विशाल फटे यांच्यासोबत त्याच्या कुटुंबातील इतर 4 सदस्यांचाही समावेश आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी विशाल फटे हा मात्र फरार आहे.
फटे स्कॅममधील मुख्य आरोपी असलेल्या विशाल फटे याचा जवळचा मित्र दीपक आंबरे यांनीच तक्रार दिली आणि या प्रकरणाच भांडाफोड झाला. आंबरे यांची तक्रार दाखल होताच बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारींचे पेवच फुटले. केवळ एकाच दिवसात जवळपास 40 लोकांकडून विशाल फटे याच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशाल फटे याच्याव गुन्हा दाखल झाला तेव्हा केवळ 6 लोखांच्या तक्रारी होत्या. मात्र हळूहळू या तक्रारींची सख्या वढतच आहे. त्यामुळे गुन्हा आणि घोटाळ्याची व्याप्तीही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. (हेही वाचा, PPF मध्ये पैसा गुंतवून करोडपती होण्याची संधी; पाहा काय आहे फंडा)
दाखल झालेल्या एकूण तक्रारदारांपैकी 6 तक्रारदारांनी फटे याने 5 कोटी 63 लाख रुपयांची फकवणूक केल्याची तक्रार आहे. मात्र, जसजशा तक्रारी वाढत गेल्या तसतशी फसवणुकीची रक्कम 12 कोटींव पोहोचली आहे. ही रक्कम 200 कोटींवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरिक्षकांकडे असलेल्या या प्रकरणाचा तपास आता व्याप्ती पाहून डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली जाण्याचीही शक्यता आहे.
विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. पाठिमागील काही वर्षांपासून तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयाजवळ त्याचा एक नेट कॅफे होता. साई नेट कॅफे असे त्याचे नाव. या नेट कॅफेच्या माध्यमातून त्याने लोकसंपर्क वाढवला. लोकांचा विश्वास संपादन करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन दुप्पट तिप्पट कमाई करुन कोट्यवधींचा फायदा करुन देण्याची त्याचे आमिष त्याने लोकांना दाखवले. बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला. त्याच्या पसार होण्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाची तीन ते चार पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर त्याच्या कुटुंबातील काहींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.