Mumbai Accident: एल्फिन्स्टन ब्रिजवर भीषण अपघात, दुचाकीच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू, गुन्हा दाखल
एल्फिन्स्टन ब्रिज परळ येथे एक अपघात झाला आणि या अपघातात एका पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Mumbai Accident: मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज परळ येथे एक अपघात झाला आणि या अपघातात एका पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची नोंद भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर (Accident) आरोपीविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून आरोपी सध्या फरार आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे देखील एका अपघात झाला होता त्यात पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले होते. (हेही वाचा-रस्ता ओलांडताना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकाचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश आणि धनराज घाग (25) हे केटीएम बाईकवरून जात असताना पुलावर कारची धडक झाली. धनराज घाग हे रस्त्यावरून जात असताना बाईकने धडक दिली. या धडकेत धनराज यांना भरपूर दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलो. तेथे त्यांना मृत्य घोषित केले. हा अपघात गोंविद स्वामी यांनी पाहिला होता त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवला.
पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज हे मुंबई पोलिसांच्या स्थानिक विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्ताच आई आणि बहिण आहे. त्याचा मृतदेह चुलत भावा किरण घाग यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. चालकाला मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांसह, IPC च्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 338 (मानवी जीवन धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत आरोपांचा सामना करावा लागतो.