Buldhana Accident: ओव्हरटेकच्या नादात स्लीपरकोच बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी, 8 प्रवाशी गंभीर

पुण्यातून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या स्लीपरकोच बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Accident (PC - File Photo)

Buldhana Accident: पुण्याहून (Pune) शेगावला येणाऱ्या परिवहन  महामंडळाच्या स्लीपरकोच बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  ट्रक आणि बसच्या धडकेत अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली देऊळगाव राजा रोडवर रामनगर फाट्यावर हा अपघात घडून आला. शुक्रवारी (9 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशी जखमी तर आहे. तर आठ प्रवाशी गंभीर जकमी झाले आहेत. या अपघातानंतर रस्त्यावर बराचं वेळ वाहतुक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपघातस्थळी स्थानिक पोलिस पोहोचले. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णलायत दाखल केले. जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. बसचा समोरील भाग संपुर्ण चेंदामेंदा झाला आहे. बस आणि ट्रकची जोरात धडक असल्याने अपघात घडून आला. बस ओव्हरट्रेक करत असताना अपघात घडून आला अशी माहिती पोलिसांना मिळाली. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली. (हेही वाचा- परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; तीन भावंडांचा मृत्यू)

स्थानिक पोलिस या अपघाताची अधिक तपासणी करत आहे. 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात आपतकालीन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहे. रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यात आले आहे. अपघातामुळे जवळच्या गावात एकच खळबळ उडाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif