Road Accident Near Nashik: नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला नाशिक मार्गावर भीषण अपघात, 4 जण ठार, 6 जण गंभीर जखमी
सप्तशृंगीच्या (Saptshrungi Temple) मंदिरात नवस फेडून परतत असणाऱ्या भाविकांच्या आयशर गाडीला एका भरधाव ट्रक ने धडक दिल्याने चार जणांचा जागच्या जागी मृत्यू झाला आहे तर तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे. नाशिकच्या मार्गावरील कृष्णगाव येथे झालेला हा अपघात इतका भीषण होता की त्यात मालवाहू ट्रकने धडक दिलेली गाडी साधारण 20 ते 25 फूट अंतरापर्यंत फरफटत गेली.
रविवारी रात्री त्र्यंबकेश्वरचे रहिवाशी माणिक ठाकूर हे गृहस्थ सप्तशृंगी गडावरून नवस फेडून आपल्या 20 ते 25 नातेवाईकांच्या सोबत आयशर गाडीतून परतीचा प्रवास करत होते, प्रवासादरम्यान गाडी दोनवेळा बंद पडली त्यानंतर कसेबसे कृष्णागाव येथे पोहचल्यावर अचानक गाडीचे ब्रेक खराब झाल्याने त्यांनी बिघडलेली गाडी गतिरोधकाजवळ रस्त्याच्या कडेला लावली होती. घरी परत जाण्यासाठी दुसऱ्या गाडीची सोय करायला म्हणून या कुटुंबातील काही जण गाडीच्या बाहेर उतरत होते, पण इतक्यात वाणीच्या दिशेने नाशिकला जात असणाऱ्या भरधाव मालवाहु ट्रकने आयशर गाडीला जोरात धडक दिली आणि यातच गाडीच्या मागे उभे असलेले अशोक ठाकूर (23), कुणाल कैलास ठाकूर (25), गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (30) व आशिष माणिक ठाकूर (30) या चौघांचा जागच्या जागी मृत्यू झाला. Mumbai Pune Expressway Bus Accident: मुंबई पुणे महामार्गावर बस धडकल्याने भीषण अपघात, 2 जण ठार, 20 जण जखमी
ट्रकने दिलेली धडक इतकी प्रचंड होती की त्यामुळे गाडीत बसलेल्या ललीताबाई अशोक ठाकूर, अनिल रमेश ठाकूर, ध्रुप बिंद्राबन ठाकूर, रंजिता ध्रुप ठाकूर, माणिक चिंतुलाल ठाकूर आणि पल्लवी ठाकूर या भाविकांना देखील गंभीर जखम झाली तसेच, अन्य दहा बारा जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघात झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो ऐकून आसपासच्या वस्तीतील लोकांना जाग आली आणि टाकाल त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी भाविकांना जवळील रुग्णालायत उपचारासाठी नेले.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून वारंवार होणाऱ्या अपघातामुळे रस्ता सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.