शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय तर भावनिक साथ हवीय, अभिनेता नाना पाटेकर यांची राजकीय नेत्यांवर टीका

महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जाच्या बोझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

Actor Nana Patekar (Photo Credits-Facebook)

अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीबाबतचा (Loan Waivers) मुद्दा उचलून धरत त्यांना कर्जमाफी नकोय तर भावनिक साथ द्या अशी टीका राजकीय नेत्यांना केली आहे. महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जाच्या बोझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर दुष्काळग्रस्त भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक दिसून आले आहे.

राजकीय नेते मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आर्थिक मदत करण्यास असमर्थ असल्यास त्याचा काही पर्वा नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय तर त्यांना भावनिक साथ देणे अत्यंत गरजेचे आहे. आम्हाला राजकीय नेत्यांशी याबाबत बोलावे लागणार असल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी हा एकट्याने कर्जमाफीबाबत काहीच करु शकत नाहीत पण ते भिकारी पण नाहीत असा टोला सुद्धा नाना पाटेकर यांनी लगावला आहे. त्यावेळी नाना पाटेकर यांनी चिंचवड येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीच्या राजकरणातील चाणाक्य असल्याचे ही नाना पाटेकर यांनी म्हटले. तसेच गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नाम फाऊंडेशनला मदत करत असल्याने त्यांचे आभार मानले आहेत. एवढेच नाही प्रत्येक पक्षातील नेतेमंडळी हे माझे मित्रच आहेत.(10 रुपये थाळीसाठी फोटो काढा व आधार कार्ड घेऊन या, राज्य सरकार च्या या नव्या नियमाबद्दल वाचा सविस्तर)

तर शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी या बाबत लोकांनी विचार करायला हवा. कारण सध्या शेतमालाचे दर वाढल्यावर लोकांचे महिन्याभराचे बजेट कोलमडते. त्या उलट ज्या  वेळेस तुम्ही मॉलमध्ये एखादी गोष्ट खरेदी करता त्यावेळी त्याचा भाव करता का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. पण सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला  पुरेसा बाजारभाव मिळत नसल्याने  त्यांचे वेळापत्रक बिघडले गेल्याची खंत सुद्धा नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी सुद्धा नाना पाटेकर यांनी उस्मानाबाद मधील जिल्ह्यातील 113 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना  प्रत्येकी 14 हजार रुपयांची मदत केली होती.