शरद पवार यांच्या नावाने मंत्रालयात फोन; बदली संदर्भात आलेल्या 'त्या' कॉलमागे नेमका हेतू काय?

प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्यांसंदर्भात हा फोन होता. मात्र खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का? याची पडताळणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नावे मंत्रालयात एक कॉल आला होता. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्यांसंदर्भात हा फोन होता. मात्र खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का? याची पडताळणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा कॉल फेक असून शरद पवार यांच्या आवाजात दुसरंच कोणीतरी बोलत होतं. दरम्यान, याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. (Sharad Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करणार? शरद पवार म्हणतात 'आनंद आहे!'; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य)

सिल्व्हर ओक येथून बोलत असल्याचे सांगून आणि शरद पवार यांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात फोन केला. अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात चर्चा केली. मात्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन संदर्भात शंका वाटली आणि खातरजमा करण्यासाठी त्यांने सिल्व्हर ओक येथे कॉल केला. त्यावर पवार साहेबांनी कॉल केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली आणि यासंदर्भात पोलिसांना तक्रार देण्यात आली. (Sharad Pawar meets Amit Shah: शरद पवार यांनी सांगितला अमित शाहा यांच्यासोबतच्या बैठकीचा तपशील)

ANI Tweet:

दोन-तीन दिवसांपूर्वी आलेल्या या फोनप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या फोनमागे नेमका काय उद्देश होता? शरद पवार यांचे नाव का घेण्यात आले? का हा केवळ खोडसाळपणा होता? याची स्पष्टता पोलिस तपासात मिळणार आहे.