गणपती आणि माउंट मेरी उत्सवामुळे BEST कडून ज्यादा बसेसची सोय; जाणून घ्या मार्ग आणि वेळापत्रक
तसेच उद्यापासून बांद्रा येथे प्रसिद्ध माउंट मेरी फेअर (Mount Mary Fair) सुरु होत आहे. मात्र सध्या पावसाने त्यात विघ्न आणले आहे. हीच समस्या ओळखून बेस्टने (BEST) मुंबईकरांसाठी ज्यादा बसेसची (Extra Buses) सोय केली आहे
2 सप्टेंबर, 2019 रोजी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणरायाचे आगमन झाले आहे. एकूण 11 दिवस बाप्पा घरात विराजमान असणार आहेत. आजचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) सहावा दिवस. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. राजधानी मुंबईमध्ये तर या उत्सवाचा थाट विचारूच नका. या 11 दिवसांच्या काळात अनेक भक्तगण सार्जनिक मंडळांच्या तसेच इतर महत्वाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात. तसेच उद्यापासून बांद्रा येथे प्रसिद्ध माउंट मेरी फेअर (Mount Mary Fair) सुरु होत आहे. मात्र सध्या पावसाने त्यात विघ्न आणले आहे. हीच समस्या ओळखून बेस्टने (BEST) मुंबईकरांसाठी ज्यादा बसेसची (Extra Buses) सोय केली आहे.
मुख्यत्वे रात्री नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या बसेस धावणार आहेत. बेस्टने ट्विट करत ही माहिती दिली आहे. गणपती उत्सवासाठी काही महत्वाच्या मार्गांवर बेस्टच्या बसेस रात्री सुरु राहणार आहेत. 8 ते 11 सप्टेंबर या काळात या बसेस धावणार आहेत.
या मार्गांवर धावतील बसेस –
उद्यापासून ख्रिस्चन बांधवांचा माउंट मेरी फेअर सुरु होत आहे. मदर मेरीची जयंती उद्या माउंट मेरी चर्च, बांद्रा येथे साजरी केली जाईल. त्यानंतर 8 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात अनेक ख्रिस्चन बांधव या चर्चला भेट देतात. या चर्चला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने ज्यादा बसेसची सोय केली आहे. 8 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये बांद्रा स्टेशन ते हिल रोड या दरम्यान या ज्यादा बसेस धावणार आहेत. (हेही वाचा: मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन; आपत्कालीन परिस्थितीत 'या' नंबरवर साधा संपर्क)
दरम्यान, माउंट मेरी चर्च हे मुंबई शहरातील एक प्रसिद्ध चर्च आहे. हे माउंट ऑफ अवर लेडी ऑफ बॅसिलिका म्हणून देखील ओळखले जाते. हे चर्च 1640 मध्ये बांधले गेली आणि 1761 मध्ये त्याची पुनर्रचना केली. इथे मदर मेरीची जयंती फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.