Param Bir Singh यांच्या विरूद्ध ठाणे पोलिस स्थानकातील नोंद खंडणीच्या गुन्ह्यांच्या तपास CID करणार
लवकरच बुकी केतन तन्ना आणि व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या केसेस देखील ट्रान्सफर केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून शुक्रवारी (24 सप्टेंबर) परमबीर सिंह सह काही पोलिस अधिकार्यांवरील खंडणीच्या गुन्ह्याची केस ठाणे पोलिसांकडून राज्याच्या सीआयडी कडे देण्यात आली आहे. दरम्यान ठाणे पोलिसांकडे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह डीसीपी पराग मनेरे, बिल्डर संजय पुनामिया, व्यावसायिक सुनील जैन आणि मनोज घाटकर सोबतच कोपरी पोलिसांच्या 3 अधिकार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परमबीर सिंह यांच्याविरूद्ध दाखल असलेला हा तिसरा गुन्हा आहे. ज्याचा तपास सीआयडी करून करण्यात येणार आहे. यापूर्वी ठाणे आणि मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये इन्सपेक्टर भीमराव घाडगे यांनी एफआयआर दाखल केली होती. तर बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांची देखील तक्रार नोंदवण्यात आली होती. यांचा तपास देखील सीआयडी कडे आहे. नक्की वाचा: Maharashtra Police :परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार.
ANI Tweet
जुलै महिन्यात श्याम सुंदर अग्रवाल यांच्या पुतण्याने दाखल केलेल्या एफआयआर मध्ये नोव्हेंबर 2016 ते मे 2018 दरम्यान जेव्हा सिंह ठाण्याचे डीसीपी होते तेव्हा त्यांनी 2 कोटी खंडणी घेतली होती. यावेळी त्यांनी बळजबरीने कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडल्याचं म्हटलं आहे.
TOI च्या वृत्तानुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, ही काही प्रकरणं सीआयडी कडे देणं गरजेची होती कारण ती जटील असून त्यामध्ये आरोपी हे प्रभावी पोलिस अधिकारी आहेत.
परमबीर सिंह यांच्याविरूद्ध 5 एफआयआर आहेत. लवकरच बुकी केतन तन्ना आणि व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या केसेस देखील ट्रान्सफर केल्या जाणार आहेत. राज्य सरकारकडून स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर शेखर जगताप यांची नेमणूक केली आहे.