Extortion Case: परमबीर सिंह यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, ठाणे पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी
ठाणे नगर पोलिसांनी (Thane Police) मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. तसेच लूक आऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
ठाणे नगर पोलिसांनी (Thane Police) मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. तसेच लूक आऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. याचबरोबर खंडणीच्या प्रकरणात (Extortion Case) गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या इतर 27 जणांना लवकरच अशाप्रकारची नोटीस जारी केली जाणार आहे. पोलिस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. या
“लुकआऊट नोटीसची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. आत्तापर्यंत, परमबीर सिंह यांची सूचना पूर्ण झाली आहे, इतर प्रगतीपथावर आहेत. आम्ही तक्रारदाराच्या विधानांची पडताळणी करीत असून सर्व पुराव्यांची तपासणी केली जात आहे", ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. परम बीर सिंह यांच्यावर ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये टॉप पोलिस, अंडरवर्ल्ड गुंड आणि पत्रकार यांचा समावेश असलेल्या 27 जणांसह खंडणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे देखील वाचा- Forced Sex In Marriage: पत्नीसोबत जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंधाला बेकायदेशीर म्हणता येणार नाही, मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल
एएनआयचे ट्वीट-
तक्रारदार केतन तन्ना यांच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईला विलंब होत असल्याचा दावा केला आहे. वकील सागर कदम म्हणाले की, “माझ्या क्लायंटने काही आरोपींना त्याच्या मागे जाताना पाहिले आणि पोलिसांना कळवले, पण त्यांनी कोणालाही अटक केली नाही. आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवतो पण अद्याप अटक न करण्याचे कारण समजत नाही. ”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)