Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज

यामध्ये भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सोबत अन्य पक्ष असं सरकार बनलेले आहे.

Mahayuti Govt | X @Devendra Fadnavis

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आज 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये  मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये 4136 उमेदवारांचे भवितव्य कैद झाले आहे. आता 23 नोव्हेंबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे. पण तत्पूर्वी आज एक्झिट पोल चे अंदाज (Exit Poll Results) जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महायुती (Mahayuti) पुन्हा राज्यात सरकार बनवणार असल्याचं पहायला मिळत आहे. इलेक्ट्रोल एज, मॅट्रिझ, चाणाक्य स्टॅट्रेजीझ, पी मार्क आणि पिपल्स पल्स यांच्या एक्झिट पोल अंदाजानुसार महायुती कडे सत्ता स्थापन करण्यासारख्या जागा त्यांच्याकडे असणार आहेत.  महायुती मध्ये भाजपा कडे सर्वाधिक जागा असण्याचा अंदाज देखील या एक्झिट पोल मध्ये पहायला मिळत आहे. आता हे चित्र 23 नोव्हेंबरला पहायला मिळणार आहे.   MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज .

महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतो?  

इलेक्ट्रोल एज

मॅट्रिझ

चाणाक्य स्टॅट्रेजीझ

पी मार्क

पिपल्स पल्स

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी 145 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे.  सध्या राज्यात महायुती चं सरकार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सोबत अन्य पक्ष असं सरकार बनलेले आहे. यामध्ये भाजप (१०४), शिवसेना (४०), राष्ट्रवादी (४१), काँग्रेस (४३), शिवसेना उबाठा (१६), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार(१२) आणि अन्य 22 आमदार आहेत.  शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार मध्ये मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif