Maharashtra Assembly Election 2024 Result: सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची आघाडी कायम
या मतदारसंघात काँग्रेससह अपक्ष उमेदवार असल्याने मोठी अडचण होईल, अशी चर्चा असताना सततच्या कामामुळे सांगलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवत सुधीर गाडगीळ यांना मतपेटीतून आशीर्वाद दिले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 Result: पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे मानली जाणारी सांगली विधानसभा मतदारसंघात (Sangli Assembly Constituency) विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Hari Gadgil) हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतयं. या मतदारसंघात काँग्रेससह अपक्ष उमेदवार असल्याने मोठी अडचण होईल, अशी चर्चा असताना सततच्या कामामुळे सांगलीकरांनी भाजप (BJP) वर विश्वास ठेवत सुधीर गाडगीळ यांना मतपेटीतून आशीर्वाद दिले आहेत.
मागील दोन टर्म पासून सांगलीतील अनेक प्रश्नांसाठी त्यांनी विधानसभेच्या दरबारी वेळोवेळी आवाज उठवला. त्यामुळेच पतंगराव कदम यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये आता काँग्रेसला पसंती न देता भाजपच्या उमेदवाराला पसंती देण्यात येत असल्याचं चित्र आहे. परिणामी सुधीर गाडगीळ यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Maharashtra and Jharkhand Election Results 2024: महाराष्ट्र-झारखंडमधील विजयानंतर भाजप चाखणार विजयाची चव! दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू (Watch Video))
सांगलीत काँग्रेसचे पृथ्वीराज गुलाबराव पाटील पिछाडीवर -
सांगलीमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज गुलाबराव पाटील सध्या पिछाडीवर असून बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यादेखील पिछाडीवर आहेत. सांगलीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या होत्या. (हेही वाचा -Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर)
या मतदार संघामध्ये सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक न लढवण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु, पक्षाने अचानकच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी मध्ये निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी संपूर्ण मतदारसंघांमध्ये दौरा करून वातावरण भाजपमय केले. मागील काळात केलेल्या कामांच्या जोरावर त्यांना ओबीसी मतांचा जास्त फायदा झाला.